मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs AUS: दिनेश कार्तिक एवजी ऋषभ पंत करणार होता ओपनींग; मात्र, अखेरच्या क्षणी रोहितनं बदलला निर्णय

IND vs AUS: दिनेश कार्तिक एवजी ऋषभ पंत करणार होता ओपनींग; मात्र, अखेरच्या क्षणी रोहितनं बदलला निर्णय

Sep 24, 2022, 10:53 AM IST

    • IND vs AUS: रोहित हा दिनेश कार्तिक एवजी ऋषभ पंतला सुरवातीला बॅटिंग करायला पाठवणार होता. मात्र, ट्याने एनवेळी हा निर्णय बदलला. याबाबत रोहित म्हणाला, आम्ही ऋषभ पंतला सुरवातीला खेळण्यासाठी पाठवण्याचा विचार करत होतो. पण, त्याला वाटले की सैम्स हा शेवटी ओवर टाकणार. सैम्स हा ऑफ कटर बॉलिंग करतो. त्यामुळे दिनेशला न खेळू देणे हा पर्याय होता.
IND vs AUS

IND vs AUS: रोहित हा दिनेश कार्तिक एवजी ऋषभ पंतला सुरवातीला बॅटिंग करायला पाठवणार होता. मात्र, ट्याने एनवेळी हा निर्णय बदलला. याबाबत रोहित म्हणाला, आम्ही ऋषभ पंतला सुरवातीला खेळण्यासाठी पाठवण्याचा विचार करत होतो. पण, त्याला वाटले की सैम्स हा शेवटी ओवर टाकणार. सैम्स हा ऑफ कटर बॉलिंग करतो. त्यामुळे दिनेशला न खेळू देणे हा पर्याय होता.

    • IND vs AUS: रोहित हा दिनेश कार्तिक एवजी ऋषभ पंतला सुरवातीला बॅटिंग करायला पाठवणार होता. मात्र, ट्याने एनवेळी हा निर्णय बदलला. याबाबत रोहित म्हणाला, आम्ही ऋषभ पंतला सुरवातीला खेळण्यासाठी पाठवण्याचा विचार करत होतो. पण, त्याला वाटले की सैम्स हा शेवटी ओवर टाकणार. सैम्स हा ऑफ कटर बॉलिंग करतो. त्यामुळे दिनेशला न खेळू देणे हा पर्याय होता.

नागपूर : नागपुर येथे झालेल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर दिनश कार्तिक हा चर्चेत आला आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणात दोन बॉलमध्ये तूफान फटकेबाजी करत केवळ २ बॉलमध्ये १० रन काढत कार्तिकने भारताला विजय मिळून दिला. मात्र, रोहित हा दिनेश एवजी ऋषभला बॅटिंग करण्यासाठी पाठवणार होता. याचा खुलासा खुद्द रोहित शर्माने  मॅच झाल्यावर केला आहे. पावसामुळे या सामन्यात काही वेळ बाधा आली होती. यामुळे हा सामना केवळ ८ षटकांच्या खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करत ९० धावा काढल्या. भारताने ही धावसंख्या ६ विकेट गमवत चार बॉल राखीव ठेवत हा सामना जिंकला. या सोबतच या सिरिजमध्ये १-१ बरोबरी केली.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

रोहित शर्मा या बाबत सामना झाल्यावर म्हणाला, मी हा विचार करत होतो की ऋषभ पंतला बॅटिंगसाठी पाठवले जाऊ शकते. पण नंतर मी हा विचार केला की शेवटचा ओवर हा सैम्स टाकणार. आणि सैम्स ऑफ कटर ही बॉलिंग करतो. दिनेश कार्तिकलाच खेळण्यासाठी पाठवले. कारण तो फीनिशर म्हणून ओळखला जातो.

८ ओवर मध्ये ऑस्ट्रेलियाने ९१ धावांचे लक्ष भारतीय संघापुढे ठेवले होते. धावांचे लक्ष गाठतांना कार्तिकला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्याला ७ व्या ओवरच्या पाचव्या बॉलवर संधी मिळाली. यावेळी हार्दिक पांड्या बाद झाला होता. यावेळी रोहित शर्माने ७ व्या ओवरच्या शेवटच्या बॉलवर चौकार मारत सामना हा भारताच्या बाजूने वळवला होता या नंतर दिनेश कार्तिकने फीनिशिंग टच देत डेनियल सैम्सच्या शेवटच्या ओवरच्या पहिल्या बॉलवर बैकवर्ड स्केअर लेगच्या दिशेने षटकार हाणला. या नंतर दुसऱ्या बॉलवर ट्याने पुन्हा डीप मिड विकेटच्या दिशेने चौकार मारत केवळ दोन बॉलमध्ये १० धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दूसऱ्या बाजूने नाबाद ४६ रन काढत कॅप्टन रोहित शर्मा कार्तिकच्या बॅटिंग स्टाइलमुळे आनंदी दिसला.

 

विभाग