मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Faith Thomas : दिग्गज क्रिकेटपटू फेथ थॉमस यांचं मेलबर्नमध्ये निधन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा

Faith Thomas : दिग्गज क्रिकेटपटू फेथ थॉमस यांचं मेलबर्नमध्ये निधन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर शोककळा

Apr 18, 2023, 06:09 PM IST

    • Faith Thomas Passed Away : ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. त्यामुळं आता क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
Faith Thomas Passed Away In Melbourne (HT)

Faith Thomas Passed Away : ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. त्यामुळं आता क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

    • Faith Thomas Passed Away : ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज महिला क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. त्यामुळं आता क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

Faith Thomas Passed Away In Melbourne : भारतात आयपीएलचा थरार रंगलेला असतानाच आता ऑस्ट्रेलियातून क्रिकेटसाठी वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू फेथ थॉमस यांचं राजधानी मेलबर्नमध्ये वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ९० व्या वर्षी थॉमस यांनी मेलबर्नमधील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी असल्यामुळं त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते, परंतु आता त्यांना वाचवण्यात अपयश आल्यामुळं ऑस्ट्रेलियात शोक व्यक्त केला जात आहे. फेथ थॉमस या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्य आदिवासी महिला क्रिकेटर होत्या. त्यांनी अनेक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. क्रिकेट शिवाय त्यांनी हॉकी या खेळातही नशीब आजमावलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू फेथ थॉमस यांनी १९५८ साली इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळत आपल्या क्रिकेटमधील करियरला सुरुवात केली होती. अॅडलेड येथील हॉस्पिटलमधून त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतलेले होते. परंतु क्रिकेटची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नसल्यामुळं त्यांनी नर्सिंगचे क्षेत्र सोडून क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियातील पहिल्या आदिवासी महिला खेळाडू असल्यामुळं अनेकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली होती. त्यामुळं आता त्यांच्या निधनामुळं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

RCB vs CSK IPL 2023 : पराभव झाल्यानंतर कोहलीने धोनीला कवटाळले, फोटो पाहून चाहत्यांची बल्ले-बल्ले

वर्षभरात ऑस्ट्रेलियन क्रिकेटला दुसरा धक्का...

काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णदार शेन वॉर्न याचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आदिवासी महिला खेळाडू फेथ थॉमस यांचं निधन झाल्यामुळं वर्षभरात दुसऱ्या एका खेळाडूचं निधन झाल्यामुळं अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियात सराव सामन्यात सीन एबोटचा भरधाव बाऊन्सर टोलवताना ऑस्ट्रिलयन फलंदाज फिलीप व्ह्यूज गंभीर जखमी झाला होता. मेलबर्नमध्ये काही दिवस उपचार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.