मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs CSK IPL 2023 : पराभव झाल्यानंतर कोहलीने धोनीला कवटाळले, फोटो पाहून चाहत्यांची बल्ले-बल्ले

RCB vs CSK IPL 2023 : पराभव झाल्यानंतर कोहलीने धोनीला कवटाळले, फोटो पाहून चाहत्यांची बल्ले-बल्ले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 18, 2023 05:44 PM IST

RCB vs CSK IPL 2023 : सीएसकेविरुद्ध विराट कोहली पहिल्याच षटकात बाद झाला होता. परंतु फाफ-मॅक्सवेलच्या वादळी खेळीमुळं आरसीबीने कडवी झुंज दिली.

Mahendra Singh Dhoni And Virat Kohli Relationship
Mahendra Singh Dhoni And Virat Kohli Relationship (HT)

Mahendra Singh Dhoni And Virat Kohli Relationship : यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी आणि महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावर चाहत्यांचं लक्ष आहे. विराट कोहलीच्या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही तर यंदाचा आयपीएल हा धोनीसाठी अखेरचा असल्याचं बोललं जात असल्यामुळं दोघांसाठीही यंदाचं आयपीएल हे खास आणि स्पेशल आहे. काल झालेल्या सामन्यात सीएसकेने अखेरच्या षटकात आरसीबीला पराभूत करत आयपीएलमध्ये तिसरा विजय मिळवला आहे. परंतु सीएसकेकडून पराभव झाल्यानंतरही विराट कोहलीने निराश न होता मैदानात जाऊन महेंद्रसिंह धोनीला मिठी मारत प्रेम व्यक्त केलं आहे. याबाबतचा एक खास फोटो शेयर करत कोहलीने मजेशीर कॅप्शन देखील दिलं आहे.

चेन्नईकडून पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने एक खास फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. विराटने इन्स्टाग्रामवर धोनीसोबतचा फोटो शेयर केला असून कॅप्शनमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचा हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. याशिवाय (=) असं चिन्ह लिहून महेंद्रसिंह धोनीलाही टॅग केलं आहे. त्यामुळं आता विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून चाहत्यांमध्ये त्यांच्या मैत्रीबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. आरसीबी आणि सीएसकेतील सामना संपल्यानंतर विराट आणि धोनी एकमेकांशी हसत-खेळत चर्चा करताना दिसले. याशिवाय दोन्ही दिग्गज खेळाडूंनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा देखील मारल्या.

संकटकाळात धोनी मदतीला धावून आला- विराट

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जेव्हा फॉर्ममध्ये नव्हता तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका करत त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्यावर बोलताना विराटने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, मी जेव्हा संकटात होतो, फॉर्म नसल्यामुळं अनेक लोक टीका करत होते, त्यावेळी फक्त महेंद्रसिंह धोनीने मला फोन करून संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रेरणा दिली होती. धोनी शिवाय इतर कोणत्याही खेळाडूने मला फोन करून अथवा भेटून मदत केली नव्हती, असा खुलासा खुद्द विराट कोहलीने केला होता. त्यामुळं आता विराटने आरसीबीचा पराभव होऊनही धोनीला कवटाळल्याने त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

WhatsApp channel