मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asia Cup 2022 Prize: आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेवर पैशांचा पाऊस; पाहा, कोणाला किती रक्कम मिळाली

Asia Cup 2022 Prize: आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंकेवर पैशांचा पाऊस; पाहा, कोणाला किती रक्कम मिळाली

Sep 12, 2022, 02:11 PM IST

    • Asia Cup 2022 Prize Money: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते.
asia cup 2022

Asia Cup 2022 Prize Money: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते.

    • Asia Cup 2022 Prize Money: आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते.

आशिया चषक टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (११ सप्टेबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकत श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा २३ धावांनी धुव्वा उडवला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

आशिया चषकाच्या जेतेपदासाठी श्रीलंकेला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी १.५ लाख डॉलर्सचा ( भारतीय १.२ कोटी रुपये) चेक श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला. यासोबतच 'प्लेअर ऑफ द मॅच' आणि 'प्लेअर ऑफ द सिरीज'सह अनेक बक्षीसे श्रीलंकेच्या खेळाडूंनी कमावली आहेत.

सोबतच, वानिंदू हसरंगा याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरविण्यात आले. त्याला १५ हजार डॉलरचा (१२ लाख रुपये) धनादेश देण्यात आला. तसेच, भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षेला ५ हजार डॉलर्सचा (४ लाख) धनादेश देण्यात आला.

पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. पाकिस्तानला बक्षीस म्हणून ७५ हजार डॉलर (सुमारे ६० लाख रुपये) देण्यात आले.

आशिया चषकात श्रीलंकन खेळाडूंची शानदार कामगिरी

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेची कामगिरी फारशी खास नव्हती. विशेष म्हणजे, श्रीलंकेचा संघ विजेतेपदाचा दावेदारही मानला जात नव्हता. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तानला या स्पर्धेच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते. तसेच, पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा पराभवदेखील केला होता.

मात्र, या जिव्हारी लागणाऱ्या या पराभवानंतर श्रीलंकेने जोरदार कमबॅक केले आणि स्पर्धेतील सर्वच संघांचा पराभव करुन आशिया चषकावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षेने सर्वाधिक ७१ आणि वनिंदू हसरंगाने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४७ धावाच करू शकला. मोहम्मद रिझवानने ५५ आणि इप्तीखार अहमदने ३२ धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने ४ आणि वनिंदू हसरंगाने ३ बळी घेतले.