मराठी बातम्या  /  धर्म  /  Lakshmi Panchami 2023 : अशी करा श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवीची पूजा

Lakshmi Panchami 2023 : अशी करा श्री लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवीची पूजा

Mar 26, 2023, 01:17 AM IST

  • Lakshmi Panchami Pooja Vidhi : शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितलं. त्यापाठोपाठ आज म्हणजेच रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत.

श्री लक्ष्मी (हिंदुस्तान टाइम्स)

Lakshmi Panchami Pooja Vidhi : शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितलं. त्यापाठोपाठ आज म्हणजेच रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत.

  • Lakshmi Panchami Pooja Vidhi : शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितलं. त्यापाठोपाठ आज म्हणजेच रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत.

चैत्र महिन्याची सुरूवात झाली आणि लागोपाठ सण उत्सवांची जणू मालिकाच सुरू झाली आहे.शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितलं. त्यापाठोपाठ आज म्हणजेच रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत. हे व्रत श्री लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. हे व्रत केल्यास कुटुंबात समृद्धी येते.श्री लक्ष्मी पंचमी आज दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

आधी आंघोळ करून एका पाटावर लाल कापड किंवा भगवं कापड अंथरून देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची तसबीर किंवा धातुची मूर्ती  ठेवावी. त्यामुर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालावं. मूर्ती समोर साजूक तुपातलं निरांजन लावावं आणि सुगंधी उदबत्ती लावावी. त्यानंतर श्री लक्ष्मी मातेची आणि श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि श्री लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवावा. यादिवशी फक्त सात्विक अन्नच खावं. 

श्री पंचमीच्या पूजेने काय प्राप्त होतं.

लक्ष्मी मातेला धनाची देवी मानलं गेलं आहे.  सहाजिकच शुद्ध अंतकरण आणि भक्तीभावाने देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची पूजा केल्यास संपत्ती मिळते असं सांगितलं जातं. खऱ्या भक्तीने केलेली उपासना धन, सुख आणि समृद्धी देते. 

श्री पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा स्थापित करणे खूप शुभ आहे. 

या दिवशी माता लक्ष्मी साक्षात् श्रीयंत्रात विराजमान असते. 

श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये केल्याने धनाचा ओघ वेगाने वाढतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी लक्ष्मी पंचमी व्रत अवश्य पाळावे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा