मराठी बातम्या  /  धर्म  /  Chaitra Vinayak Chaturthi 2023 : दोनच दिवसावर आलीय चैत्र विनायक चतुर्थी

Chaitra Vinayak Chaturthi 2023 : दोनच दिवसावर आलीय चैत्र विनायक चतुर्थी

Mar 23, 2023, 03:20 PM IST

  • First Chaturthi Of Hindu Year : चैत्रातली म्हणजेच हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी कधी आली हे समजलंच नाही. हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी येत्या २५ मार्च रोजी आहे. याला चैत्र विनायक चतुर्थी असही म्हटलं जातं.

चैत्र विनायक चतुर्थी (हिंदुस्तान टाइम्स)

First Chaturthi Of Hindu Year : चैत्रातली म्हणजेच हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी कधी आली हे समजलंच नाही. हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी येत्या २५ मार्च रोजी आहे. याला चैत्र विनायक चतुर्थी असही म्हटलं जातं.

  • First Chaturthi Of Hindu Year : चैत्रातली म्हणजेच हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी कधी आली हे समजलंच नाही. हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी येत्या २५ मार्च रोजी आहे. याला चैत्र विनायक चतुर्थी असही म्हटलं जातं.

चैत्र महिना उजाडला आणि गुढी पाडवा आणि त्याचदिवशी सुरू झालेली चैत्र नवरात्र मग स्वामी समर्थ प्रकट दिवस आणि पवित्र रमजानच्या महिन्याची होणारी सुरूवात या सर्व धामधुमीत पाहाता पाहाता चैत्रातली म्हणजेच हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी कधी आली हे समजलंच नाही. हिंदू नववर्षातली पहिली विनायक चतुर्थी येत्या २५ मार्च रोजी आहे. याला चैत्र विनायक चतुर्थी असही म्हटलं जातं. चैत्र शुद्ध ४ भरणी नक्षत्रात ही चतुर्थी साजरी केली जाणार आहे. श्रीगणेशाचे अगणित चाहते म्हणा किंवा भक्त चतुर्थी धडक्यात साजरी करणार यात शंकाच नाही. या पहिल्या चतुर्थीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत हे आपण पाहाणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

चैत्र विनायक चतुर्थी २०२३ तारीख

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, २४ मार्च रोजी दुपारी ०४ वाजून ५९  वाजता सुरू होत आहे. आणि २५ मार्च, शनिवारी संध्याकाळी ०४ वाजून २२ मिनिटांपर्यंत आहे. उदयतिथीनुसार चैत्रातील विनायक चतुर्थी २५ मार्चला आहे. या दिवशी उपवास आणि गणेशपूजा असेल.

चैत्रविनायक चतुर्थी २०२३ पूजा मुहूर्त कोणते आहेत

चैत्राच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपासून असेल. या दिवशी तुम्ही सकाळी ११.१२ ते दुपारी ०१.४० पर्यंत श्रीगणेशाची पूजा करू शकता.

चैत्र चतुर्थीला चंद्र पाहिल्यास लागू शकतो चोरीचा आरोप

चैत्र चतुर्थीला चंद्रोदय सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी होईल. शुक्ल पक्षात सकाळी चंद्र उगवतो. भगवान श्रीकृष्णाने चतुर्थीचा चंद्र पाहिला होता, तेव्हा दस्तुरखुद्द श्रीकृष्णावर रत्न चोरल्याचा आरोप झाला होता.

रवि योगात आहे विनायक चतुर्थी व्रत

विनायक चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी रवि योग तयार होतो. या दिवशी सकाळी ०६ वाजून १८ मिनिटं ते दुपारी ०१ वाजून ३९ मिनिटांपर्यंतच आहे. या दिवशी पूजा मुहूर्त संपेपर्यंत रवि योग असेल. रवि योगात पूजा करणे शुभ राहील. या योगात सूर्याचा प्रभाव जास्त असतो

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा