मराठी बातम्या  /  धर्म  /  Temples : वर्षातनं केवळ एकाच आठवड्यासाठी उघडले जातात 'या' देवळाचे दरवाजे, देवाला भाविक लिहितात पत्र

Temples : वर्षातनं केवळ एकाच आठवड्यासाठी उघडले जातात 'या' देवळाचे दरवाजे, देवाला भाविक लिहितात पत्र

Mar 13, 2023, 12:36 PM IST

  • Hasanamba Temple : वर्षातनं फक्त एकच आठवडा हे मंदिर भक्तांसाठी खुलं होतं, या मंदिरात ते मंदिर बंद करताना ठेवलेली फुलं ताजी राहातात आणि इथं लावलेला दीप वर्षभर जळत असतो असं सांगितलं तर आणखी एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल.

हसनंबा मंदिर (हिंदुस्तान टाइम्स)

Hasanamba Temple : वर्षातनं फक्त एकच आठवडा हे मंदिर भक्तांसाठी खुलं होतं, या मंदिरात ते मंदिर बंद करताना ठेवलेली फुलं ताजी राहातात आणि इथं लावलेला दीप वर्षभर जळत असतो असं सांगितलं तर आणखी एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल.

  • Hasanamba Temple : वर्षातनं फक्त एकच आठवडा हे मंदिर भक्तांसाठी खुलं होतं, या मंदिरात ते मंदिर बंद करताना ठेवलेली फुलं ताजी राहातात आणि इथं लावलेला दीप वर्षभर जळत असतो असं सांगितलं तर आणखी एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल.

भारतातली काही अशीही मंदिरं आहेत ज्याचं गूढ आजही कायम असलेलं पाहायला मिळतं. भारतात एक असं मंदिर आहे जिथे चक्क भाविका आपल्या देवतेला पत्र लिहून आपल्या समस्या मांडतात असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. इतकंच नाही तर वर्षातनं फक्त एकच आठवडा हे मंदिर भक्तांसाठी खुलं होतं, या मंदिरात ते मंदिर बंद करताना ठेवलेली फुलं ताजी राहातात आणि इथं लावलेला दीप वर्षभर जळत असतो असं सांगितलं तर आणखी एक आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसेल. मात्र हे सत्य आहे आणि हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला कर्नाटकातल्या म्हैसूर हसन जिल्ह्यात जावं लागणार आहे. आज मात्र या लेखाच्या माध्यमातून आपण या रहस्यमयी मंदिराची माहिती करुन घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Gemstones : तुमच्या राशीनुसार हे रत्न धारण करा, भाग्य उजळेल, आर्थिक भरभराट होईल, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

कुठे आहे हे मंदिर

कर्नाटकातील जुन्या म्हैसूर हसन जिल्ह्यात असलेले हसनंबा मंदिर अतिशय रहस्यमय मानले जाते. 

वर्षातनं फक्त एकदाच उघडतं मंदिर

असे म्हणतात की हे मंदिर वर्षभर उघडे राहत नाही तर ते फक्त दिवाळीच्या दिवशीच उघडते आणि तेही फक्त एक आठवडा. त्यानंतर पुढील दिवाळीपर्यंत मंदिर बंद होते. मंदिरात हसनंबा देवीची पूजा केली जाते. 

वर्षभर तेवत राहातो दिवा आणि फुले राहातात ताजी

असे म्हणतात की या  मंदिरात फक्त एक आठवडा पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी पूजा केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, जे पुढील वर्षी दिवाळीत पुन्हा उघडतात. शेवटच्या दिवशी, मंदिराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी, एक दिवा लावला जातो ज्यामध्ये मर्यादित प्रमाणात तेल ओतले जाते आणि काही ताजी फुले ठेवली जातात.

येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दीपावलीच्या दिवशी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेव्हा दिवा जळताना आढळतो आणि त्याशिवाय हसनंबा देवीला अर्पण केलेली फुले वर्षभरानंतरही ताजी दिसतात. देवीला अर्पण केलेला नैवेद्य पुढच्या वर्षापर्यंत ताजा राहतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा