मराठी बातम्या  /  धर्म  /  Vivah Panchami Tomorrow : उद्या थाटात साजरी होणार विवाह पंचमी, सजणार अयोध्या नगरी

Vivah Panchami Tomorrow : उद्या थाटात साजरी होणार विवाह पंचमी, सजणार अयोध्या नगरी

Nov 27, 2022, 02:20 PM IST

  • What Is The Importance Of Vivah Panchami : राम-सीतेच्या विवाहाचे पुन्हा व्हा साक्षीदार, करा सीता-रामाची पूजा. विवाह योग येतील जुळून. 

सोमवारी साजरी होणार विवाह पंचमी (हिंदुस्तान टाइम्स)

What Is The Importance Of Vivah Panchami : राम-सीतेच्या विवाहाचे पुन्हा व्हा साक्षीदार, करा सीता-रामाची पूजा. विवाह योग येतील जुळून.

  • What Is The Importance Of Vivah Panchami : राम-सीतेच्या विवाहाचे पुन्हा व्हा साक्षीदार, करा सीता-रामाची पूजा. विवाह योग येतील जुळून. 

पंचांगानुसार विवाहपंचमी हा सण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. यंदा विवाह पंचमी २८ नोव्हेंबर रोजी थाटात संपन्न होणार आहे. शास्त्रानुसार या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता. ज्योतिष शास्त्रानुसार विवाहपंचमी हा धार्मिक आणि शुभ कार्य करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अनेक शुभ मुहूर्त आहेत. त्याचबरोबर अभिजीत मुहूर्त आणि सर्वार्थ सिद्धी योग हाही योगायोग ठरत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Varuthini Ekadashi 2024 : काय आहे वरुथिनी एकादशीचे महत्त्व? कशी मिळते पापातून मुक्ती? वाचा संपूर्ण कथा

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

यंदा कोणते आहेत विवाह पंचमीचे मुहूर्त कोणती आहे शुभ वेळ घ्या जाणून

विवाह पंचमी २०२२

विवाह पंचमी तारीख - २८ नोव्हेंबर, सोमवार

पंचमी तिथीची सुरुवात - २७ नोव्हेंबर दुपारी ५ वाजता

पंचमी तिथी समाप्त - २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटं

२८ नोव्हेंबर रोजी उदया तिथी असल्याने त्याच दिवशी विवाह पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे.

विवाह पंचमी २०२२ चे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त - सकाळी ११ वाजून ४८ मिनिटं ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत

सर्वार्थ सिद्धी योग - २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटं ते संध्याकाळी ६ वाजून ५४ मिनिटांपर्यंत

रवि योग - २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटं

काय आहे विवाह पंचमीचं महत्व

माता सीता आणि भगवान श्री राम यांचा विवाह पंचमीच्या दिवशी झाला होता. म्हणूनच या दिवशी माता सीता आणि श्री राम यांची पूजा केली जाते. या दिवशी पूजाविधी केल्याने वैवाहिक जीवनात आनंदच प्राप्त होतो, असे मानले जाते.

यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीपासून सुटका मिळते. खासकरुन अयोध्येत ही विवाह पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा