मराठी बातम्या  /  धर्म  /  Ram Navami 2023 : रामनवमीची पूजा करताना अशी घ्याल काळजी

Ram Navami 2023 : रामनवमीची पूजा करताना अशी घ्याल काळजी

Mar 29, 2023, 09:06 AM IST

  • Do & don't On Ram Navami : रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला गेला आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता.

प्रभू श्रीराम (हिंदुस्तान टाइम्स)

Do & don't On Ram Navami : रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला गेला आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता.

  • Do & don't On Ram Navami : रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला गेला आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता.

रामनवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मात एक अत्यंत पवित्र दिवस म्हणून मानला गेला आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता. रामाला युगपुरुष म्हणतात. गेली कित्येक शतके श्रीरामाची पूजा घरोघरी मनोभावे केली जाते आणि रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा पाळणा घरोघरी हलवला जातो.

ट्रेंडिंग न्यूज

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला या गोष्टी लक्षात ठेवा, शनि जयंतीचं धार्मित महत्व काय? जाणून घ्या

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

May 2024 Shubh Muhurat : विवाह, गृहप्रवेश ते नामकरण… मे महिन्यातील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

Auspicious Yogas : तुमच्या कुंडलीत हे ४ योग आहेत का? असतील तर एक दिवस तुम्ही नक्की करोडपती व्हाल!

श्रीराम हे आदर्शचं प्रतीक आहे. यंदा रामनवमी ३० मार्च २०२३ रोजी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. माता दुर्गेची नवरात्रही याच दिवशी संपन्न होणार आहे. देवळांमध्ये श्रीरामांच्या जन्माचा गजर केला जाईल. भक्तीभावात आणि आनंदात रामनवमी साजरी केली जाईल. रामाच्या दर्शनाला राम मंदिरांमध्ये भक्त गर्दी करतील.

इतक्या आनंदाने हा सण साजरा करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नयेत याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

रामनवमीला कोणत्या गोष्टी कराल

रामनवमीच्या पूजेत काय करावे

राम नवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं आणि सूर्याला अर्ध्य द्यावं

रामनवमीच्या दिवशी श्री रामचरितमानसचीही पूजा करावी.

भगवान श्रीरामांच्या पूजेमध्ये पिवळे वस्त्र, पिवळी फुले आणि पिवळे चंदन अर्पण करावं. असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

तुळशीची माळ श्रीरामांना अर्पण करावी, तुळस ही भगवान श्रीविष्णूंना प्रिय आहे आणि भगवान श्रीराम हे श्रीविष्णूंचाच एक अवतार आहेत.

रामनवमीच्या दिवशी स्नान-दानाचे विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. आपल्अया शक्तीनुसार गरजुंना दान करावं. हे दान अत्यंत पुण्याचं मानलं जातं.

रामनवमीच्या दिवशी रामरक्षास्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे.

रामनवमीच्या पूजेत काय करू नये

श्री रामनवमीचे व्रत करणार्‍या व्यक्तीने इतरांबाबत वैरभाव मनात ठेवू नये.

या दिवशी उपवास करून ब्रह्मचर्य पाळावं.

रामनवमीच्या दिवशी कोणाचेही मन दुखवलं जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. रामनवमीच्या दिवशी एखाद्याला दुखावणं हे मोठं पाप मानलं जातं.

भगवान श्रीरामाच्या पूजेमध्ये शिळी फुले अर्पण करू नयेत, नेहमी ताज्या फुलांचा वापर करावा.

रामनवमीच्या दिवशी पूजा करताना दिवा विझला तर तोच दिवा पुन्हा प्रज्वलित करु नका त्याऐवजी नवा दिवा लावावा.

रामनवमीच्या दिवशी सात्विक आहारच घ्यावा. इतर प्रलोभनांपासून दूर राहावं.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा