मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : ‘या’ पाच सवयी माणसाला कायम करतात कंगाल

Garuda Purana : ‘या’ पाच सवयी माणसाला कायम करतात कंगाल

May 25, 2023, 07:17 AM IST

  • Things Not To Do According To Garuda Purana : आज आपण गरूड पुराणात सांगितलेल्या या पाच वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत, या सवयी ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती कायम कंगाल राहाते.

गरूड पुराणात सांगितलेल्या पाच वाईट सवयी (HT)

Things Not To Do According To Garuda Purana : आज आपण गरूड पुराणात सांगितलेल्या या पाच वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत, या सवयी ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती कायम कंगाल राहाते.

  • Things Not To Do According To Garuda Purana : आज आपण गरूड पुराणात सांगितलेल्या या पाच वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत, या सवयी ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती कायम कंगाल राहाते.

गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत, अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

ट्रेंडिंग न्यूज

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

या पुराणाचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत. यामध्ये भक्ती, ज्ञान, शांतता, सदाचार, नि:स्वार्थी कार्याच्या महिमाबरोबरच यज्ञ, दान, तपश्चर्या, तीर्थयात्रा इत्यादी शुभ कर्मांमध्ये सर्वसामान्यांना प्रवृत्त करण्यासाठी अनेक लौकिक व इतर ऐहिक फलांचे वर्णन केले आहे. याशिवाय आयुर्वेद, नीतिशास्त्र इत्यादी विषयांच्या वर्णनाबरोबरच मृत आत्म्याच्या शेवटच्या क्षणी करावयाच्या कृतींचे तपशीलवार वर्णन केले आहे. प्रबोधनाची चर्चा हा देखील त्याचा मुख्य विषय आहे.

आज आपण गरूड पुराणात सांगितलेल्या या पाच वाईट सवयींबद्दल बोलणार आहोत, या सवयी ज्या व्यक्तीमध्ये असतात ती व्यक्ती कायम कंगाल राहाते. कोणत्या आहेत त्या पाच वाईट सवयी पाहूया.

गरूड पुराणात सांगितलेल्या पाच वाईट सवयी कोणत्या?

घाणेरडे कपडे घालणे

गरुड पुराणानुसार, जर कोणी सतत घाणेरडे, अस्वच्छ कपडे घालत असेल तर माता लक्ष्मी त्याच्यावर कोपते. लक्ष्मी मातेला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे.

सतत इतरांचे दोष शोधणाऱ्या व्यक्ती

गरुड पुराणानुसार सतत इतरांची आलोचना करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात दारिद्र्य कायम राहाते यात विनाकारण ओरडणारे, इतरांचे वाईट करणारे आणि वाईट बोलणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश होतो.

सूर्योदय झाल्यावरही झोपणाऱ्या व्यक्ती

गरुड पुराणानुसार जे लोक जास्त वेळ झोपतात ते आळशी असतात.अशा व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या असतात, त्यामुळे तुमचे काम करताना आळस पूर्णपणे काढून टाका.

पैशाचा दुराभिमान असणाऱ्या व्यक्ती

गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीला त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीचा अकारण गर्व असतो ती व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असते. अशा लोकांच्या घरी लक्ष्मी माता जास्त काळ राहत नाही.

कठोर परिश्रम टाळणाऱ्या व्यक्ती

गरुड पुराणानुसार, जर एखादी व्यक्ती कठोर परिश्रमापासून दूर राहात असल्यास किंवा दिलेले काम नीट न केल्यास त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी रूष्ट होते. तसेच कष्ट न करता इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीही कमनशीबीच ठरतात. यश त्यांच्यापासून सतत दूर पळते.

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा