मराठी बातम्या  /  धर्म  /  Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नात प्रेयसी किंवा प्रियकर दिसला आहे का? याचा अर्थ शुभ की अशुभ? जाणून घ्या

Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नात प्रेयसी किंवा प्रियकर दिसला आहे का? याचा अर्थ शुभ की अशुभ? जाणून घ्या

Apr 22, 2024, 05:48 PM IST

    • swapna shastra : बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात. पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.
Swapna Shastra : तुम्हाला स्वप्नात प्रेयसी किंवा प्रियकर दिसला आहे का? याचा अर्थ शुभ की अशुभ? जाणून घ्या

swapna shastra : बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात. पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.

    • swapna shastra : बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्नं पाहतात आणि यातील काही जण तर सकाळी विसरूनही जातात. पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.

Swapna Shastra : एखादी व्यक्ती झोपेत असताना अनेक प्रकारची स्वप्नं पडतात. या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ असतात. काही स्वप्ने अशुभ तर काही स्वप्ने भविष्यासाठी शुभ मानली जातात. तुम्ही स्वप्नात जे काही पाहता त्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे  का? स्वप्न शास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya Wishes : कुटुंबातील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी द्या अक्षय्य तृतीयेला या खास शुभेच्छा

Maharana Pratap Jayanti Wishes : वीर पराक्रमी राजा महाराणा प्रताप जयंतीच्या खास शुभेच्छा

Bhojan Niyam : जेवण करताना हे नियम लक्षात ठेवा, माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद मिळेल

Jadu Tona Tips : तुमच्यावर कोणी जादूटोणा केला आहे का ते कसं ओळखणार? हे संकेत सांगतील, वाचा

अशातच जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला पाहिले तर याचेही वेगवेगळे संकेत असू शकतात. 

पण तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला तुमच्या स्वप्नात कोणत्या अवस्थेत पाहिले आहे, यावर ते अवलंबून आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला स्वप्नात पाहिल्याने कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात? ते जाणून घेऊया.

… तर तुमचे नाते लग्नापर्यंतही पोहोचू शकते

स्वप्नात तुमचा प्रियकर किंवा गर्लफ्रेंड हसताना दिसला तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे प्रेम मिळणार आहे. तसेच, तुमचे नाते लग्नापर्यंतही पोहोचू शकते.

सतर्क राहण्याची गरज 

जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला स्वप्नात रडताना पाहिले असेल तर हे स्वप्न अशुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात तुमचा प्रियकर किंवा गर्लफ्रेंड रडताना पाहणे हे सूचित करते की तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावलेला किंवा तुमच्या नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे.

चांगली बातमी मिळू शकते

याशिवाय स्वप्नात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलत असाल तर हे स्वप्न शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला आयुष्यात काही मोठी चांगली बातमी मिळणार आहे. हे स्वप्न सूचित करते की तुमचा जोडीदार तुमचा जीवनसाथी होऊ शकतो.

प्रेम जीवनात समस्या उद्भवू शकतात

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या जोडीदारासोबत भांडताना पाहिले असेल तर याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)े

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा