मराठी बातम्या  /  धर्म  /  Akshaya Tritiya Wishes : कुटुंबातील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी द्या अक्षय्य तृतीयेला या खास शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes : कुटुंबातील आनंद व उत्साह वाढवण्यासाठी द्या अक्षय्य तृतीयेला या खास शुभेच्छा

May 09, 2024, 04:29 PM IST

    • Akshaya Tritiya 2024 Wishes : अक्षय्य तृतीया हा सर्वात शुभ प्रसंगांपैकी एक मानला जातो. वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीया पाळली जाते. उत्सव म्हणजे अखंड समृद्धी. यानिमित्त शुभेच्छा संदेश देऊन आपले संबंध अक्षय्य करा.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya 2024 Wishes : अक्षय्य तृतीया हा सर्वात शुभ प्रसंगांपैकी एक मानला जातो. वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीया पाळली जाते. उत्सव म्हणजे अखंड समृद्धी. यानिमित्त शुभेच्छा संदेश देऊन आपले संबंध अक्षय्य करा.

    • Akshaya Tritiya 2024 Wishes : अक्षय्य तृतीया हा सर्वात शुभ प्रसंगांपैकी एक मानला जातो. वैशाख महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीया पाळली जाते. उत्सव म्हणजे अखंड समृद्धी. यानिमित्त शुभेच्छा संदेश देऊन आपले संबंध अक्षय्य करा.

यंदा शुक्रवार १० मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य अक्षय्य फळ देते. म्हणूनच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा कधीच “क्षय” होत नाही असे म्हणतात.

ट्रेंडिंग न्यूज

Narasimha Jayanti : कोण आहे भगवान नृसिंह? वाचा विष्णू देवाच्या चौथ्या अवताराची कथा आणि पूजेची शुभ वेळ

Weekly Festivals : बुद्ध पौर्णिमा ते एकदंत चतुर्थी… मे महिन्याच्या ‘या’ आठवड्यातील सणांची यादी, पाहा

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण असून, यादिवशी सोने-चांदी, घर-संपत्ती, वाहन खरेदी करण्याला खास महत्व आहे. हा सण स्त्रियांसाठी विशेष आहे कारण याच दिवशी लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या माहेरी येतात. 

या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग होईल. अक्षय्य तृतीयेला सूर्य मेष राशीत आणि चंद्र वृषभ राशीत म्हणजेच दोघेही आपल्या उच्च राशीत असतात. याशिवाय बृहस्पति देखील वृषभ राशीत आहे, जो शुभ संयोग मानला जात आहे.

महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याची सांगता देखील या अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने केली जाते. अशा अक्षय्य लाभ देणाऱ्या सणानिमित्त अक्षय्य शुभेच्छा देऊन सणाला आणखी खास बनवूया.

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक काम होवो पूर्ण..

न काही राहो अपूर्ण..

धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..

घरात होवो लक्ष्मीचं आगमन

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा

ज्या आनंदाची अपेक्षा आहे

ती या अक्षय तृतीयेला पूर्ण होवो

तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा

तुम्हा आम्हा सर्वांना भरपूर सुख मिळो

जीवनातले सारेच दुख टळो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,

तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

लक्ष्मीचा वास होवो

संकटांचा नाश होवो

शांतीचा वास राहो

धनाची बरसात होवो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..

तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया

या सणाच्या निमित्ताने सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..

येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,

सुख, समाधान घेऊन येवो.."

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

अक्षय्य राहो नाती

अक्षय्य राहो आयुष्य

अक्षय्य राहो चेहऱ्यावरचा आनंद

अक्षय्य राहो माणुसकी

अक्षय्य राहो मनातील सर्व इच्छा-अपेक्षा

अक्षय्य राहो धनसंपत्ती,

अक्षय्य राहो तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या