वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना ग्रहांच्या स्थितीनुसार खूप मनोरंजक आणि फायदेशीर ठरू शकतो. मे महिन्यात अनेक महत्त्वाचे संक्रमण आहेत. त्यापैकी १ मे रोजी गुरूचे संक्रमण झाले आहे. गुरूचे हे १ वर्षानंतरचे संक्रमण होते, आता गुरू मे २०२५ पर्यंत वृषभ राशीत असेल.
याशिवाय १० मे रोजी बुध आणि १४ मे रोजी सूर्याचे राशीपरिवर्तन होईल. यानंतर शुक्र देखील आपले राशी बदलेल. अशा प्रकारे मे महिन्यात या ग्रहांचे संक्रमण काही शुभ योग निर्माण करत आहे. यात त्रिग्रही योगाचा समावेश आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मे महिन्यात एक नव्हे तर तीन त्रिग्रही योग तयार होत आहेत. हे त्रिग्रही योग काही राशींना भरपूर संपत्ती मिळवून देणार आहेत. तसेच त्यांच्या जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी हा त्रिग्रही योग शुभ आहे.
मेष :
आर्थिकदृष्ट्या हा महिना मेष राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या लोकांना नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरदारांना फायदा होईल. व्यापाऱ्यांचा विस्तार होईल. एकूणच करिअरसाठी हा काळ चांगला आहे. याशिवाय आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळही मिळेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगली आहे, भविष्यात तुम्हाला मोठे उत्पन्न मिळू शकते. काही मालमत्ता खरेदी देखील करू शकतात. कौटुंबिक जीवनातही सुधारणा होईल.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अतिशय शुभ आहे. एवढ्या ग्रहांचा आशीर्वाद मिळून तुम्हाला सर्व क्षेत्रात यश मिळेल. अपूर्ण कामे अचानक पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे मिळतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल. जुने मतभेद संपतील. काही महत्त्वाचे प्रकल्प किंवा करार अंतिम करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता जास्त आहे.
मिथुन:
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग देखील फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला नवीन स्त्रोतांचा फायदा होईल. बँक बॅलन्स वाढेल. गुंतवणुकीचे नियोजन कराल. जोखमीची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. अंगारक योगही तयार होत असल्याने कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)