मराठी बातम्या  /  धर्म  /  Mahavir Jayanti Wishes : तीसाव्या वर्षी गृहत्याग करणारे, महावीर जयंती निमित्त पाठवा खास शुभेच्छा

Mahavir Jayanti Wishes : तीसाव्या वर्षी गृहत्याग करणारे, महावीर जयंती निमित्त पाठवा खास शुभेच्छा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 20, 2024 04:31 PM IST

Mahavir Jayanti 2024 Wishes : अहिंसेच्या तत्त्वावर भर देणारे भगवान महावीर यांचा २१ एप्रिल २०२४ रविवार रोजी, जयंती उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त त्यांच्या गुणांचे चिंतन करूया आणि खास शुभेच्छा देऊया.

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. यावर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी केली जाणार आहे. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. भगवान महावीर यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते.

कुंडग्रामात किंवा कौंडिण्यपुरात महावीरांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे या उपनगराचे प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला एका राजाची मुलगी होती. महावीरांची प्रवृत्ती लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग केला.

भगवान महावीर हे २४ वे आणि शेवटचे जैन ऋषी मानले जातात. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन धर्मियांसाठी हा एक शुभ दिवस असतो. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांच्या स्मरणार्थ हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करुया आणि खास शभेच्छा पाठवूया.

अरिहंतांची बोली, सिद्धांचा सारांश

शिक्षकांचा धडा, संतांची संगत

अहिंसेचा प्रचार,

महावीर जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा!

अहिंसेचा मार्ग दाखवून

जगाला प्रेमाची शिकवण देणारे

जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर

महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त

विनम्र अभिवादन

सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या

भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त

सर्व जैन बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा

संपूर्ण जगाला अहिंसा , दया,

क्षमा, शांती, मैत्री,

जगा अण जगू द्या हा संदेश देणारे

भगवान महावीर

यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

रागावर शांतीने विजय मिळवा,

दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि

असत्यावर सत्यांने विजय मिळवा!

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे,

तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष

च्या रुपात आहेत.

या शत्रूंवर विजय मिळवूया

महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया!

कोणतीही हिंसा आणि नकारात्मकता

तुम्हाला स्पर्श करू शकत नाही.

सुसंवादी जीवन जगण्यासाठी

तुम्हाला नेहमी भरपूर संधी मिळू दे.

महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.

आपले जीवन साधेपणाने व्यतीत करूया

सुखी आणि निरोगी जीवनासाठी

भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूया.

महावीर जयंती निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

जीवनाचे सौंदर्य आणि आनंद साधेपणामध्ये आहे.

साध्या साध्या शब्दांमध्ये महान विचार

व्यक्त करण्याची ताकद असते.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला साधेपणाचे आयुष्य लाभो.

महावीर जयंतीच्या शुभेच्छा

WhatsApp channel

विभाग