मराठी बातम्या  /  धर्म  /  Subhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही उपाधी कोणी दिली?

Subhash Chandra Bose Jayanti : नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही उपाधी कोणी दिली?

Jan 23, 2023, 10:04 AM IST

  • Facts About Netaji Subhash Chandra Bose : देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते फक्त इंग्रजांशी दोन हात करुनच मिळेल या मतावर नेताजी सुभाषचंद्र बोस ठाम होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस (हिंदुस्तान टाइम्स)

Facts About Netaji Subhash Chandra Bose : देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते फक्त इंग्रजांशी दोन हात करुनच मिळेल या मतावर नेताजी सुभाषचंद्र बोस ठाम होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.

  • Facts About Netaji Subhash Chandra Bose : देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते फक्त इंग्रजांशी दोन हात करुनच मिळेल या मतावर नेताजी सुभाषचंद्र बोस ठाम होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते फक्त इंग्रजांशी दोन हात करुनच मिळेल या मतावर नेताजी सुभाषचंद्र बोस ठाम होते. त्यासाठीच त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांच्या विचारांनी त्यावेळचे अनेक तरुण प्रेरित झाले होते. नेताजींच्या “तुम मुझे खुन दो, मैं तुम्हें आझादी दूंगा” या आवाहनाला त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती आहे. नेताजींबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Festival List May 2024 : मे महिन्यातील सण-उत्सव, जयंतीची संपूर्ण यादी; जाणून घ्या तारीख, वार आणि महत्व

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थी कधी? यंदा चतुर्थीला तयार होतायत हे शुभ संयोग, जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

नेताजींचा जन्म कधी झाला?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक, ओडिशा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी होते. सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात तडफदार होते. इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी नागरी परीक्षा उत्तीर्ण केली.

नेताजींबद्दल काही रोचक तत्थ्य

महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोस यांनी 'राष्ट्रपिता' असे संबोधले होते.

सुभाषचंद्र बोस यांना १९२१ ते १९४१ या काळात देशातील वेगवेगळ्या तुरुंगात ११ वेळा तुरुंगवास भोगावा लागला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची दोनदा निवड झाली होती.

सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दल बोलायचे झाले तर ते आजपर्यंत गूढच राहिले आहे.१९४५ मध्ये जपानला जात असताना सुभाषचंद्र बोस यांचे विमान तैवानमध्ये क्रॅश झाले होते. तरीही त्याचा मृतदेह सापडला नाही.

सुभाषचंद्र बोस यांना 'नेताजी' ही पदवी कोणी दिली?

जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने सुभाषचंद्र बोस यांना पहिल्यांदा 'नेताजी' म्हणून संबोधले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सुभाषचंद्र बोस यांना रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून देश नायक ही पदवी मिळाली असे म्हणतात.

 

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा