मराठी बातम्या  /  धर्म  /  Mokshada Ekadashi 2022 : मोक्ष देणारी एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त?

Mokshada Ekadashi 2022 : मोक्ष देणारी एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आज, कोणते आहेत शुभ मुहूर्त?

Dec 03, 2022, 09:58 AM IST

  • Shubh Muhurta & Importance Of Mokshada Ekadashi : मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे.

मोक्षदा एकादशी आज (हिंदुस्तान टाइम्स)

Shubh Muhurta & Importance Of Mokshada Ekadashi : मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे.

  • Shubh Muhurta & Importance Of Mokshada Ekadashi : मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे.

मोक्षदा एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ही एकादशी खासकरुन भगवान विष्णूला समर्पित आहे. एकादशी तिथी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षात येते. मोक्षदा एकादशीचं व्रत आज म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध ११ अर्थात ३ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होत आहे. पिकरांना मोक्ष मिळवून देणारी एकादशी म्हणूनही या एकादशीकडे पाहिलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

Ravi Pradosh Vrat 2024 : मे महिन्याचे पहिले प्रदोष वृत कधी? शुभ मुहूर्त, पुजा कशी करायची? जाणून घ्या

May 2024 Shubh Muhurat : विवाह, गृहप्रवेश ते नामकरण… मे महिन्यातील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

Auspicious Yogas : तुमच्या कुंडलीत हे ४ योग आहेत का? असतील तर एक दिवस तुम्ही नक्की करोडपती व्हाल!

Hanuman Jayanti : हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जयंतीत काय फरक आहे? तुमचाही गोंधळ होतो, जाणून घ्या

काय आहे मोक्षदा एकादशीचं महत्व

आजच्याच दिलशी भगवान श्रीविष्णू यांनी करु क्षेत्रात अर्जुनाला गीतेचं ज्ञान दिलं होतं. म्हणूनच या दिवसाला गीता जयंती असंही संबोधलं जातं.धार्मिक मान्यता असंही सांगते की या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

कोणते आहेत मोक्षदा एकादशीचे शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटलं जातं. यंदा मोक्षदा एकादशी ३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून ३९ मिनिटांनी सुरू होईल आणि ४ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून ३४ मिनिटांनी संपेल.

४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी होणार आहे.

३ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी व्रत साजरं केलं जाणार आहे.

कशी करावी मोक्षदा एकादशी पूजा

सकाळी लवकर उठा आणि आंघोळ करुन शुद्ध व्हा.

घरातल्या देवघरात दिवा लावा.

श्रीविष्णूंना गंगेच्या पाम्याने अभिषेक करा.

श्रीविष्णूंना फूलं आणि तुळशीची पानं अर्पण करा.

शक्य झाल्यास या दिवशी उपवास करा.

देवपूजा करा.

देवाला प्रसाद अर्पण करा. देवाला फक्त सात्विक गोष्टीच प्रसादात दिल्या जातात हे लक्षात ठेवा.

श्रीविष्णूंना प्रसाद अर्पण करताना त्यात तुळशीपत्र आवर्जुन ठेवा. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.

या दिवशी भगवान श्रीविष्णूंसोबत लक्ष्मीमातेचीही पूजा करा.

देवाचं ध्यान करा.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा