मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  विजयाचा जल्लोष! तिने जर्सी काढून हवेत फिरवत मैदानाला मारली फेरी

विजयाचा जल्लोष! तिने जर्सी काढून हवेत फिरवत मैदानाला मारली फेरी

Aug 03, 2022, 09:56 AMIST

इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातील फुटबॉल सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या क्लो केलीने जर्सी काढून हवेत फिरवल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

  • इंग्लंड विरुद्ध जर्मनी यांच्यातील फुटबॉल सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडच्या क्लो केलीने जर्सी काढून हवेत फिरवल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
फुटबॉलचे खेळाडू नेहमीच जोशात असतात. मग ते पुरुष असोत की महिला फुटबॉलपटू त्यांच्यातला उत्साह नेहमीच जास्त असतो. दरम्यान, युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये एका महिला फुटबॉलपटूने जल्लोष साजरा करताना जर्सी काढून ती हवेत फिरवली.
(1 / 7)
फुटबॉलचे खेळाडू नेहमीच जोशात असतात. मग ते पुरुष असोत की महिला फुटबॉलपटू त्यांच्यातला उत्साह नेहमीच जास्त असतो. दरम्यान, युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये एका महिला फुटबॉलपटूने जल्लोष साजरा करताना जर्सी काढून ती हवेत फिरवली.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
लंडनच्या वेंबली स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंड आणि जर्मनी यांचे संघ आमने सामने होते. सामन्यात १-१ असी बरोबरी होती आणि सामना संपण्यासाठी काही वेळच शिल्लक होता. मात्र इंग्लंडच्या क्लो केलीने एक्स्ट्रा टाइममध्ये गोल करून सामन्याचा निकालच बदलून टाकला.
(2 / 7)
लंडनच्या वेंबली स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात इंग्लंड आणि जर्मनी यांचे संघ आमने सामने होते. सामन्यात १-१ असी बरोबरी होती आणि सामना संपण्यासाठी काही वेळच शिल्लक होता. मात्र इंग्लंडच्या क्लो केलीने एक्स्ट्रा टाइममध्ये गोल करून सामन्याचा निकालच बदलून टाकला.(फोटो - एएफपी)
इंग्लंडने सामना २-१ गोलफरकाने जिंकला आणि या सामन्यानंतर २४ वर्षांच्या क्लो केलीने तिची जर्सी काढली. स्टेडियममध्ये धावत तिने जर्सी हवेत फिरवली. विशेष म्हणजे या सामन्यासाठी जवळपास ८७ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. प्रेक्षकांची स्टेडियममधील इतक्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हा एक मोठा विक्रमच आहे.
(3 / 7)
इंग्लंडने सामना २-१ गोलफरकाने जिंकला आणि या सामन्यानंतर २४ वर्षांच्या क्लो केलीने तिची जर्सी काढली. स्टेडियममध्ये धावत तिने जर्सी हवेत फिरवली. विशेष म्हणजे या सामन्यासाठी जवळपास ८७ हजार प्रेक्षकांची उपस्थिती होती. प्रेक्षकांची स्टेडियममधील इतक्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हा एक मोठा विक्रमच आहे.(फोटो - एएफपी)
जर्मनीविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा सामना हाफ टाइमपर्यंत कोणत्याही गोलशिवाय होता. तर अखेरच्या काही मिनिटांपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत सुटण्याची शक्यता होती. दरम्यान, केलीने एक्स्ट्रा टाइममध्ये ११० व्या मिनिटाला गोल करून सामना जिंकून दिला.
(4 / 7)
जर्मनीविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा सामना हाफ टाइमपर्यंत कोणत्याही गोलशिवाय होता. तर अखेरच्या काही मिनिटांपर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत सुटण्याची शक्यता होती. दरम्यान, केलीने एक्स्ट्रा टाइममध्ये ११० व्या मिनिटाला गोल करून सामना जिंकून दिला.(फोटो - रॉयटर्स)
केलीच्या या जल्लोषाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्रेंडी चेस्टनने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे की,'केलीला आता आयुष्यभर या जल्लोषाचा फायदा मिळेल."
(5 / 7)
केलीच्या या जल्लोषाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्रेंडी चेस्टनने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे की,'केलीला आता आयुष्यभर या जल्लोषाचा फायदा मिळेल."(फोटो - एपी)
महिला फुटबॉलपटूने अशा प्रकारे आनंद साजरा केल्यानं अर्थातच त्याची चर्चा झाली नाही तर नवल म्हणावे लागेल. केलीच्या अशा पद्धतीने आनंद साजरा करण्यामुळे फुटबॉल जगतातील २३ वर्षांपूर्वीच्या ब्रेंडी चेस्टन हिने केलेल्या जल्लोषाची आठवण ताजी झाली.
(6 / 7)
महिला फुटबॉलपटूने अशा प्रकारे आनंद साजरा केल्यानं अर्थातच त्याची चर्चा झाली नाही तर नवल म्हणावे लागेल. केलीच्या अशा पद्धतीने आनंद साजरा करण्यामुळे फुटबॉल जगतातील २३ वर्षांपूर्वीच्या ब्रेंडी चेस्टन हिने केलेल्या जल्लोषाची आठवण ताजी झाली.
१९९९ च्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये विजयानंतर अमेरिकेची फुटबॉलपटू ब्रेंडी चेस्टन हिनेही अशाच पद्धतीने जल्लोष केला होता. तेव्हा अंतिम सामना ड्रॉ झाल्यानंतर पेनाल्टीमध्ये अमेरिकेने ५-४ ने विजय मिळवला होता.
(7 / 7)
१९९९ च्या फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये विजयानंतर अमेरिकेची फुटबॉलपटू ब्रेंडी चेस्टन हिनेही अशाच पद्धतीने जल्लोष केला होता. तेव्हा अंतिम सामना ड्रॉ झाल्यानंतर पेनाल्टीमध्ये अमेरिकेने ५-४ ने विजय मिळवला होता.

    शेअर करा