मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर लंकेत हिंसाचार, खासदाराची आत्महत्या

पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर लंकेत हिंसाचार, खासदाराची आत्महत्या

May 10, 2022, 07:40 AMIST

महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर लंकेत हिंसाचार उसळला असून अनेक खासदारांची घरे आंदोलकांनी जाळली आहेत.

  • महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर लंकेत हिंसाचार उसळला असून अनेक खासदारांची घरे आंदोलकांनी जाळली आहेत.
श्रीलंकेत दोन दिवसांपूर्वी पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी सोमवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे.
(1 / 10)
श्रीलंकेत दोन दिवसांपूर्वी पुन्हा आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी सोमवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे.(फोटो - रॉयटर्स)
कुरुनेगला शहरातील महिंद्रा राजपक्षे यांचे आणि जॉन्स्टर फर्नांडो यांच्या कार्यालय आणि घराला आग लावण्यात आली आहे. याशिवाय जाळपोळीत १० पेक्षा जास्त गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाल्या आहेत.
(2 / 10)
कुरुनेगला शहरातील महिंद्रा राजपक्षे यांचे आणि जॉन्स्टर फर्नांडो यांच्या कार्यालय आणि घराला आग लावण्यात आली आहे. याशिवाय जाळपोळीत १० पेक्षा जास्त गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाल्या आहेत.(फोटो - रॉयटर्स)
सोमवारी आंदोलकांचा उद्रेक बघायला मिळाला. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
(3 / 10)
सोमवारी आंदोलकांचा उद्रेक बघायला मिळाला. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.(फोटो - रॉयटर्स)
 आंदोलकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर गाडी पेटवून दिली. हिंसाचारामध्ये सरकार समर्थक आणि आंदोलक आमने - सामने आले असून अनेक ठिकाणी दोन्ही गटात झटापट झाली आहे. 
(4 / 10)
 आंदोलकांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर गाडी पेटवून दिली. हिंसाचारामध्ये सरकार समर्थक आणि आंदोलक आमने - सामने आले असून अनेक ठिकाणी दोन्ही गटात झटापट झाली आहे. (फोटो - एएफपी)
सोमवारी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या आदेशानंतर महिंद्रा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला आहे.
(5 / 10)
सोमवारी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या आदेशानंतर महिंद्रा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला आहे.(AFP)
आंदोलकांनी आतापर्यंत अनेक खासदारांची घरे जाळली आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला असून १५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत.
(6 / 10)
आंदोलकांनी आतापर्यंत अनेक खासदारांची घरे जाळली आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला असून १५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत.(फोटो - एएफपी)
राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकिर्ती अथुरकोरला यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
(7 / 10)
राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकिर्ती अथुरकोरला यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.(फोटो - एएफपी)
टेम्पल ट्री इथं असलेल्या पंतप्रधान निवासस्थानी रात्री उशिरा दंगलखोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर राजपक्षे कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
(8 / 10)
टेम्पल ट्री इथं असलेल्या पंतप्रधान निवासस्थानी रात्री उशिरा दंगलखोरांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर राजपक्षे कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.(फोटो - एएफपी)
श्रीलंकेत माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर अनेक खासदारांची घरे आंदोलकांनी पेटवली आहेत.
(9 / 10)
श्रीलंकेत माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आग लावण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर अनेक खासदारांची घरे आंदोलकांनी पेटवली आहेत.(फोटो - एएफपी)
आर्थिक संकटात सापडलेल्या लंकेत सध्या अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर गॅस सिलिंडरसाठी मोठ्या रांगा लागल्या असून लोक गॅस ट्रक येण्याची वाट पाहत बसले आहेत.
(10 / 10)
आर्थिक संकटात सापडलेल्या लंकेत सध्या अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर गॅस सिलिंडरसाठी मोठ्या रांगा लागल्या असून लोक गॅस ट्रक येण्याची वाट पाहत बसले आहेत.(फोटो - रॉयटर्स)

    शेअर करा