मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Virat Kohli Century : विराट ठरला IPL मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज, ख्रिस गेलला मागे टाकलं

Virat Kohli Century : विराट ठरला IPL मध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा फलंदाज, ख्रिस गेलला मागे टाकलं

May 21, 2023, 11:56 PMIST

Virat Kohli Second Century In IPL 2023 : ipl 2023 च्या ७० व्या सामन्यात बंगळुरूचा (RCB) चा सामना गुजरातशी (GT) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१* धावा केल्या.

  • Virat Kohli Second Century In IPL 2023 : ipl 2023 च्या ७० व्या सामन्यात बंगळुरूचा (RCB) चा सामना गुजरातशी (GT) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१* धावा केल्या.
आयपीएल 2023 च्या ७० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सामना गुजरात टायटन्सशी (GT) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०१* धावा केल्या.
(1 / 8)

विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. आयपीएल २०२३ मधील कोहलीचे हे सलग दुसरे शतक आहे. या शतकामुळे त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७ शतके झळकावली आहेत.
(2 / 8)

गुजरात टायटन्सविरुद्ध झंझावाती फलंदाजी करताना विराटने नाबाद १०१ धावा केल्या. कोहलीने ६१ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. कोहली सलामीला उतरला होता. त्याने डुप्लेसिससोबत चांगली भागीदारी केली. पण डुप्लेसिस २८ धावा करून बाद झाला. यानंतर कोहलीने डाव सावरला.
(3 / 8)

या शतकानंतर कोहलीने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ख्रिस गेल या बाबतीत आघाडीवर आहे. गेलने २२ शतके झळकावली आहेत. कोहलीने ८ शतके झळकावली आहेत.
(4 / 8)

या शतकासह विराट कोहली आयपीएलमध्ये सलग दोन शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. अशी कामगिरी करणारा विराट तिसरा फलंदाज ठरला आहे. शिखर धवनने २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना पहिल्यांदा हा पराक्रम केला होता. 
(5 / 8)

यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने २०२२ मध्ये सलग २ शतके झळकावली होती. आता आरसीबीचा विराट कोहली अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
(6 / 8)
यानंतर राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जोस बटलरने २०२२ मध्ये सलग २ शतके झळकावली होती. आता आरसीबीचा विराट कोहली अशी कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.(all photos- iplt20.com)
विराट कोहलीच्या या शानदार शतकामुळे आरसीबीला २० षटकात ५ गडी गमावून १९७ धावा करता आल्या. एकीकडे संघ सातत्याने विकेट गमावत होता, तर दुसरीकडे विराट कोहली खंबीरपणे उभा राहून संघासाठी धावा काढत होता.
(7 / 8)

विराट कोहलीने IPL 2023 च्या १४ सामन्यांमध्ये ५३.२५ च्या सरासरीने आणि १३९.८२ च्या स्ट्राइक रेटने ६३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ अर्धशतके आणि २ शतके झळकली आहेत. 
(8 / 8)

    शेअर करा