मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  राष्ट्रपती भवनाशिवाय देशात दोन ठिकाणी आहे राष्ट्रपतींचे निवासस्थान, पाहा PHOTO

राष्ट्रपती भवनाशिवाय देशात दोन ठिकाणी आहे राष्ट्रपतींचे निवासस्थान, पाहा PHOTO

Jul 21, 2022, 10:12 PMIST

राष्ट्रपती या शहरांमध्ये किंवा भागात येतात तेव्हा इथेच थांबतात. या निवासस्थानासह परिसरात मोठी सुरक्षा असते. निवासस्थानांची देखभाल करण्यासाठी स्टाफही असतो.

  • राष्ट्रपती या शहरांमध्ये किंवा भागात येतात तेव्हा इथेच थांबतात. या निवासस्थानासह परिसरात मोठी सुरक्षा असते. निवासस्थानांची देखभाल करण्यासाठी स्टाफही असतो.
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदी विराजमान होतील. देशातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या होत्या.
(1 / 11)
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदी विराजमान होतील. देशातील सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. याआधी प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती झाल्या होत्या.(फोटो - राहुल सिंग)
देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचा मुक्काम राष्ट्रपती भवनात असतो. दिल्लीतील राष्ट्रपती भवन सर्वांनाच माहिती आहे. मात्र याशिवाय देशातील आणखी दोन शहरांमध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. मात्र, त्या ठिकाणी राष्ट्रपती क्वचितच जातात.
(2 / 11)
देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचा मुक्काम राष्ट्रपती भवनात असतो. दिल्लीतील राष्ट्रपती भवन सर्वांनाच माहिती आहे. मात्र याशिवाय देशातील आणखी दोन शहरांमध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. मात्र, त्या ठिकाणी राष्ट्रपती क्वचितच जातात.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
दिल्लीशिवाय शिमल्यात आणि हैदराबादला राष्ट्रपती निवासस्थान आहे. विश्रांतीसाठी म्हणून या निवासस्थानांचा वापर राष्ट्रपती करतात. ही परंपरा व्हाइसराय आणि गव्हर्नर जनरलच्या काळापासून चालत आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी ही दोन्ही पदे महत्त्वाची मानली जात होती. दोघेही दिल्लीतच रहायचे, पण उन्हाळ्याच्या दिवसात शिमल्याला तर कधी कधी दक्षिण भारतातील हैदराबादला जायचे.
(3 / 11)
दिल्लीशिवाय शिमल्यात आणि हैदराबादला राष्ट्रपती निवासस्थान आहे. विश्रांतीसाठी म्हणून या निवासस्थानांचा वापर राष्ट्रपती करतात. ही परंपरा व्हाइसराय आणि गव्हर्नर जनरलच्या काळापासून चालत आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी ही दोन्ही पदे महत्त्वाची मानली जात होती. दोघेही दिल्लीतच रहायचे, पण उन्हाळ्याच्या दिवसात शिमल्याला तर कधी कधी दक्षिण भारतातील हैदराबादला जायचे.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
शिमला आणि हैदराबादमध्ये दोन्ही रिट्रीट वर्षभर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी तयार असतात. जेव्हा राष्ट्रपती या शहरांमध्ये किंवा भागात येतात तेव्हा इथेच थांबतात. या निवासस्थानासह परिसरात मोठी सुरक्षा असते. निवासस्थानांची देखभाल करण्यासाठी स्टाफही असतो. शिमल्यातील राष्ट्रपती निवासस्थानाला द रिट्रीट बिल्डिंग तर हैदराबादमधील निवासस्थानाला राष्ट्रपती निलायम असं म्हटलं जातं.
(4 / 11)

शिमल्यातील राष्ट्रपती निवासस्थान असलेली द रिट्रीट इमारत ही चाराब्रा इथं आहे. शहरापासून १३ किलोमीटर दूर अंतरावर असून थोडी उंचीवर असल्यानं इथलं वातावरण मनमोहक असं आहे. रिट्रीट मशोबरा पर्वताच्या टोकावर आहे. मशोबरा हे पर्यटन स्थळ असल्यानं इथं वर्षभर पर्यटकांची रीघ लागलेली असते. उन्हाळ्याच्या दिवसात राष्ट्रपती जवळपास दोन आठवडे विश्रांतीसाठी येतात. इथूनच ते त्यांचं अधिकृत काम करू शकतील अशी व्यवस्थासुद्धा आहे.
(5 / 11)

द रिट्रीट बिल्डिंग शिमल्याच्या मेडिकल सुपरिटेंडेंटने बांधून गेतलं होतं. त्यानंतर हे रिट्रीट कोटीच्या राजांनी खरेदी केलं होतं. त्यानंतर लॉर्ड विल्यमने ही इमारत भाड्याने घेतली. तेव्हा या इमारतीला लार्टी साहीब की कोठी या नावाने ओळखलं जात होतं. पुढे ब्रिटिशांच्या काळात त्यांचे अधिकारी इथे राहू लागले. १८९६ मध्ये राजा कोटी यांनी पुन्हा इमारत ताब्यात घेत सरकारला भाड्याने दिली.
(6 / 11)

तेलंगणात हैदराबादच्या सिकंदराबाद शहरातील बोलाराम नावाच्या जागेवर राष्ट्रपती निलयम आहे. तेलुगू भाषेतील निलयम या शब्दाचा अर्थ घर किंवा निवासस्थान असा आहे. राष्ट्रपती निलयमला याआधी रेसिडन्सी हाऊस नावाने ओळखलं जात होतं. देशाचे राष्ट्रपती वर्षातून एकदा काही दिवसांसाठी या ठिकाणाहून काम करतात.
(7 / 11)

१८६० मध्ये हैदराबादचा निजाम नसीर उद दौला याने ही इमारत बांधली होती. निजाम लष्कराच्या छावणी परिसरात असलेली ही इमारत त्याच्या लष्कराच्या मुख्य अधिकाऱ्याचं निवासस्थान होती. निजाम आणि इंग्रजांच्या करारानुसार तिथे इंग्रजांना छावणी उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश रेसिडंटला कंट्री हाऊस केलं.
(8 / 11)

९० एकर परिसरात असलेल्या या राष्ट्रपती निलयममध्ये ११ खोल्या आहेत. याशिवाय गेस्ट हाऊसमध्ये १५० व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था आहे. जानेवारी २०११ मध्ये पहिल्यांदा हे निवासस्थान सर्वसामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले होते. राष्ट्रपती शक्यतो थंडीच्या दिवसात निलमयमध्ये एक ते दोन आठवड्यांसाठी जातात.
(9 / 11)

स्वातंत्र्यानंतर हैदराबादचे विलिनीकरण झाल्यानंतर सिंकदराबाद छावणी भारतीय लष्कराकडे सोपवली गेली तर रेसिडंट हाऊस राष्ट्रपती सचिवालयाकडे सोपवले गेले आणि याचे नाव राष्ट्रपती निलयम असे पडले.
(10 / 11)

आतापर्यंतच्या खूप कमी राष्ट्रपतींनी या दोन्ही निवासस्थानांचा वापर केला आहे. मात्र, प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा ते नेहमीच शिमल्यातील या राष्ट्रपतींच्या निवासस्थानी यायचे. शिमल्याच्या तुलनेत हैदराबादच्या राष्ट्रपती निलयममध्ये मात्र खूपच कमी वेळा राष्ट्रपतींचा मुक्काम असतो. तरीही तिथे सोयी सुविधा सज्ज असतात.
(11 / 11)

    शेअर करा