मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  G20 presidency : जी २० बैठकीची रणनीती ठरली; सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी केले मार्गदर्शन; पाहा फोटो

G20 presidency : जी २० बैठकीची रणनीती ठरली; सर्वपक्षीय बैठकीत PM मोदींनी केले मार्गदर्शन; पाहा फोटो

Dec 06, 2022, 10:47 AMIST

G20 presidency : गुरुवारी भारताने औपचारिकपणे G20 अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या सर्व भागांतील राजकीय नेत्यांनी या बैठकीत सहभागी होत भारतात G20 परिषद ही यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.  

G20 presidency : गुरुवारी भारताने औपचारिकपणे G20 अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या सर्व भागांतील राजकीय नेत्यांनी या बैठकीत सहभागी होत भारतात G20 परिषद ही यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले. G20 परिषदेची तयारी जोरात सुरू असून भारत G20 च्या 2023 च्या वार्षिक अधिवेशनाचे नेतृत्व करणार आहे.
(1 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वागत केले. G20 परिषदेची तयारी जोरात सुरू असून भारत G20 च्या 2023 च्या वार्षिक अधिवेशनाचे नेतृत्व करणार आहे.(ANI/PIB)
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांनी इंडोनेशियाने नोव्हेंबरमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवले या बाबत त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत पर्यटनाला चालना देण्याच्या पैलूंवर तसेच G20 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या ठिकाणांची स्थानिक अर्थव्यवस्था यावर चर्चा करण्यात आली.  
(2 / 7)
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांनी इंडोनेशियाने नोव्हेंबरमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवले या बाबत त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत पर्यटनाला चालना देण्याच्या पैलूंवर तसेच G20 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या ठिकाणांची स्थानिक अर्थव्यवस्था यावर चर्चा करण्यात आली.  (ANI/PIB)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भेट घेत या परिषदेसंदर्भात चर्चा केली.
(3 / 7)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भेट घेत या परिषदेसंदर्भात चर्चा केली.
भारताच्या अध्यक्षतेखाली G20 परिषद यशस्वी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते.
(4 / 7)
भारताच्या अध्यक्षतेखाली G20 परिषद यशस्वी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते.(ANI/PIB)
टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते एन चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.
(5 / 7)
टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते एन चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.(ANI/PIB)
G20 शिखर परिषदेच्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी.
(6 / 7)
G20 शिखर परिषदेच्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी.(PTI)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी.
(7 / 7)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी.(PTI)

    शेअर करा