मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kainat Imtiaz: काय सांगता! आशिया चषकात आई अन् मुलीची जोडी करतेय पाकिस्तानचं प्रतिनिधित्व, पाहा फोटो

Kainat Imtiaz: काय सांगता! आशिया चषकात आई अन् मुलीची जोडी करतेय पाकिस्तानचं प्रतिनिधित्व, पाहा फोटो

Oct 05, 2022, 04:06 PMIST

Kainat Imtiaz Saleema Imtiaz: पाकिस्तानची महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज सध्या चर्चेत आहे. कायनात बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया कपमध्ये खेळत आहे. ही ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिची फलंदाजी किंवा गोलंदाजी नसून तिची आई हे आहे. या आशिया चषक स्पर्धेत कायनातची आई अंपायर म्हणून काम पाहत आहे.

  • Kainat Imtiaz Saleema Imtiaz: पाकिस्तानची महिला क्रिकेटर कायनात इम्तियाज सध्या चर्चेत आहे. कायनात बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया कपमध्ये खेळत आहे. ही ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिची फलंदाजी किंवा गोलंदाजी नसून तिची आई हे आहे. या आशिया चषक स्पर्धेत कायनातची आई अंपायर म्हणून काम पाहत आहे.
कायनात इम्तियाजची आई सलीमा इम्तियाज देखील महिला आशिया कपमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. कायनातने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. 
(1 / 10)

पहिल्या फोटोमध्ये सलीमा इम्तियाज आशिया कप ट्रॉफीसोबत पोज देताना दिसत आहे. सलीमा इम्तियाज या स्पर्धेत पंच म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेत.
(2 / 10)

कायनातने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ती स्वतः आणि तिची आई दिसत आहे. कायनात पाकिस्तान संघाच्या जर्सीत आहे तर तिची आई अंपायरच्या जर्सीत दिसत आहे. या आई-मुलीची जोडी पाहून लोकांना खूप आनंद झाला आहे.
(3 / 10)

कायनात इम्तियाजने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'माझी आई पंच म्हणून ACC महिला एशिया कप २०२२ चे प्रतिनिधित्व करत आहे. तिने जे काही मिळवले त्याचा माझ्यापेक्षा जास्त अभिमान कोणालाच असू शकत नाही. माझ्यासाठी ती प्रेरणास्रोत आहे. पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे हे तिचे नेहमीच स्वप्न होते, तेच स्वप्न स्वप्न मी तिच्यासाठी आजपर्यंत जगत होते. खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर तो दिवस आला आहे. तिने स्वताहून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले.'
(4 / 10)

कायनात इम्तियाजने पुढे लिहिले की, 'माझ्या वडिलांचे खूप धन्यवाद आणि अभिनंदन, ज्यांनी आम्हाला प्रत्येक पावलावर साथ दिली. आम्हाला प्रोत्साहन दिले, आमची साथ कधीही सोडली नाही, आम्हाला अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि सर्वोत्तम समीक्षक होण्यासाठी प्रेरित केले.'
(5 / 10)

कायनात इम्तियाजची आई सलीमा इम्तियाज यांनी आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून अंपायरिंगमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सलीमाने पाकिस्तान आणि मलेशियाविरुद्धच्या सामन्यामध्येही पंच म्हणून काम पाहिले. पण, त्या सामन्यात कायनातला पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
(6 / 10)

कायनात इम्तियाज याआधी तिच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. लग्नात कायनातने लाल रंगाच्या वेडींग ड्रेसमध्ये बॅट आणि बॉल हातात घेऊन फोटोशूट केले होते. तिचे ते फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.
(7 / 10)

कायनातला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून एक दशक झाले आहे. कायनात आशियाई खेळ २०१० आणि आशियाई खेळ २०१४ या दोन्ही स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचा भाग राहिली आहे.
(8 / 10)

कायनात इम्तियाजच्या आईलाही आपल्या मुलीप्रमाणे पाकिस्तान संघाकडून क्रिकेट खेळायचे होते पण तिला संधी मिळाली नाही. संधी न मिळाल्याने २००६ मध्ये त्यांनी क्रिकेट ऑफशियिल होण्याचा निर्णय घेतला.
(9 / 10)
कायनात इम्तियाजच्या आईलाही आपल्या मुलीप्रमाणे पाकिस्तान संघाकडून क्रिकेट खेळायचे होते पण तिला संधी मिळाली नाही. संधी न मिळाल्याने २००६ मध्ये त्यांनी क्रिकेट ऑफशियिल होण्याचा निर्णय घेतला.( all photo- kainatimtiaz23)
Kainat Imtiaz and salima Imtiaz
(10 / 10)
Kainat Imtiaz and salima Imtiaz(all photo- kainatimtiaz23)

    शेअर करा