मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2023: IPL मिनी ऑक्शनमध्ये 'या' ५ खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, पाहा

IPL 2023: IPL मिनी ऑक्शनमध्ये 'या' ५ खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, पाहा

Nov 18, 2022, 05:17 PMIST

IPL 2023 auction: इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता मिनी लिलावाची प्रतीक्षा सुरू आहे. नवीन खेळाडूंवर अधिक खर्च करता यावा म्हणून अनेक संघांनी आपल्या पर्समध्ये कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सकडे (केकेआर) फक्त ७.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. २३ डिसेंबर रोजी कोची येथे IPL चे मिनी ऑक्शन होणार आहे.

  • IPL 2023 auction: इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता मिनी लिलावाची प्रतीक्षा सुरू आहे. नवीन खेळाडूंवर अधिक खर्च करता यावा म्हणून अनेक संघांनी आपल्या पर्समध्ये कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक ४२.२५ कोटी रुपये आहेत, तर कोलकाता नाइट रायडर्सकडे (केकेआर) फक्त ७.०५ कोटी रुपये शिल्लक आहेत. २३ डिसेंबर रोजी कोची येथे IPL चे मिनी ऑक्शन होणार आहे.
आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेआधी सर्व संघांनी आपापल्या रिटेन आणि रिलीज केलेल्याा खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक धक्कादायक नाव होते, ते केन विल्यसमनचे त्याला सनरायझर्स हैदराबादने बाहेरचा रस्ता दाखवला. केन विल्यमसनने मागील ८ वर्षांत हैदराबादसाठी एकूण ७६ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २१०१ धावा केल्या. त्याने एकूण ४६ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. आता २३ डिसेंबरला होणाऱ्या मिनी लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतो.
(1 / 7)

इंग्लिश संघाला यावेळच्या T20 विश्वचषकाचे जेतेपद मिळाले. यामध्ये ऑलराऊंडर सॅम करनने महत्त्वाची भूमिका बजावली. करनने वर्ल्डकपमधील ६ सामन्यात १३ बळी घेतले. सॅम करनने दुखापतीमुळे गेल्या आयपीएल लिलावात नाव समाविष्ट केले नव्हते. मात्र, यावेळी तो मिनी लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरु शकतो. सॅम करन आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिला आहे.
(2 / 7)

बेन स्टोक्स सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक फायनलमध्ये मॅचविनिंग इनिंग खेळली होती. स्टोक्स आयपीएल लिलावासाठी उपलब्ध असणार आहे. स्टोक्स यापूर्वीही आयपीएलचा भाग होता. आयपीएल २०१७ च्या लिलावात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने बेन स्टोक्सवर १४.५ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली होती. एकहाती सामने जिंकवण्याच्या क्षमतेमुळे स्टोक्स अनेक संघांच्या शॉर्टलिस्टमध्ये असेल.
(3 / 7)

निकोलस पूरनने IPL २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी एकूण १४ सामने खेळले होते. यामध्ये त्याने ३०६ धावा केल्या. म्हणजेच त्याची कामगिरी तितकीशी वाईट नव्हती. पुरनकडे मॅचविनिंग इनिंग खेळण्याची क्षमता आहे आणि हे त्याने अनेक प्रसंगी सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत पूरनही आयपीएल संघांच्या विशलिस्टमध्ये असू शकतो.
(4 / 7)

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला IPL २०२३ च्या लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा कॅमेरून ग्रीनने अप्रतिम खेळ दाखवला होता. कॅमेरून ग्रीन फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही उत्तम पर्याय आहे, जो टी-२० क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
(5 / 7)

IPL २०२३ च्या लिलावात मयंक अग्रवाललाही मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गेल्या मोसमात मयंकची फलंदाजी चांगली राहिली नाही आणि पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये नेण्यात तो अपयशी ठरला. तसे पाहिले तर मयंकची आयपीएलमधील एकूण कामगिरी वाईट नाही. त्याने आयपीएलमध्ये दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. लिलावात त्याला मोठी किंमत मिळाल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको.
(6 / 7)

IPL 2023 auction
(7 / 7)
IPL 2023 auction(all photos- instagram)

    शेअर करा