मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022: पर्पल कॅपच्या शर्यतीत हसरंगा अव्वल तर चहल पिछाडीवर, पाहा संपूर्ण यादी

IPL 2022: पर्पल कॅपच्या शर्यतीत हसरंगा अव्वल तर चहल पिछाडीवर, पाहा संपूर्ण यादी

May 20, 2022, 03:57 PMIST

आयपीएलचा १५ वा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून सामन्यांगणिक स्पर्धेत रंगत वाढत आहे. आरसीबी व गुजरातमध्ये झालेल्या ६७ व्या सामन्यानंतर पर्पल कॅप यादीत बदल झाला आहे. पर्पल कॅपसाठी साप-लुडोचा खेळ सुरू आहे. आता आरसीबीच्या वानिंदू हसरंगाने युझवेंद्र चहलला मागे टाकून पर्पल कॅप यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

वानिंदू हसरंगाने गुजरात टायटन्सविरुद्ध १ बळी घेऊन युझवेंद्र चहलला पुन्हा मागे टाकले. १४ सामन्यांत २४ विकेट्स घेऊन तो पर्पल कॅपच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याची सरासरी १५.०८ तर इकॉनॉमी रेट ७.३६ इतका आहे. 
(1 / 5)

युजवेंद्र चहलने पर्पल कॅपच्या यादीत मागील एक महिन्यापासून कायम असणारे अव्वल स्थान गमावले आहे. त्याने १३ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, त्याची सरासरी १६.८३ आहे तर इकॉनॉमी रेट ७.६ आहे. 
(2 / 5)
युजवेंद्र चहलने पर्पल कॅपच्या यादीत मागील एक महिन्यापासून कायम असणारे अव्वल स्थान गमावले आहे. त्याने १३ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, त्याची सरासरी १६.८३ आहे तर इकॉनॉमी रेट ७.६ आहे. 
कागिसो रबाडाने पर्पल कॅपच्या यादीतील आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ बळी घेतला होता. रबाडाने १२ सामन्यात एकूण २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी १७.८२ तर इकॉनॉमी रेट ७.३६ इतका आहे. 
(3 / 5)
कागिसो रबाडाने पर्पल कॅपच्या यादीतील आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १ बळी घेतला होता. रबाडाने १२ सामन्यात एकूण २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी १७.८२ तर इकॉनॉमी रेट ७.३६ इतका आहे. (kagiso rabada )
भारतातील सर्वात जलदगती गोलंदाज उमरान मलिकने १३ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी २०.०० आहे, इकॉनॉमी रेट ७.९३ आहे. भारताचा सर्वात तरुण गोलंदाज म्हणून उमरानने एकाच आयपीएल हंगामात २० हून अधिक बळी घेतले आहेत. उमरानने १३ सामन्यात २१ बळी घेतले आहे. 
(4 / 5)
भारतातील सर्वात जलदगती गोलंदाज उमरान मलिकने १३ सामन्यात २१ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी २०.०० आहे, इकॉनॉमी रेट ७.९३ आहे. भारताचा सर्वात तरुण गोलंदाज म्हणून उमरानने एकाच आयपीएल हंगामात २० हून अधिक बळी घेतले आहेत. उमरानने १३ सामन्यात २१ बळी घेतले आहे. (PTI)
दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादवने १३ सामन्यात २० बळी घेतले. त्याची सरासरी १९.३० आहे आणि इकॉनॉमी रेट ६.४५ आहे. तो पाचव्या स्थानी आहे. 
(5 / 5)
दिल्लीचा गोलंदाज कुलदीप यादवने १३ सामन्यात २० बळी घेतले. त्याची सरासरी १९.३० आहे आणि इकॉनॉमी रेट ६.४५ आहे. तो पाचव्या स्थानी आहे. 

    शेअर करा