मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : असा बदलत गेला भारताचा राष्ट्रध्वज; झेंड्यात या रंगांचाही होता प्रस्ताव!

PHOTOS : असा बदलत गेला भारताचा राष्ट्रध्वज; झेंड्यात या रंगांचाही होता प्रस्ताव!

Aug 10, 2022, 04:00 PMIST

Har Ghar Tiranga : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांना त्यांच्या घरी 'राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण' करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदींनी दोन ऑगस्टपासून रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली.

Har Ghar Tiranga : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकांना त्यांच्या घरी 'राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहण' करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदींनी दोन ऑगस्टपासून रोजी ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली.

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय लोकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी आपला राष्ट्रध्वज फडकावावा, असा या मोहिमेचा उद्देश आहे.
(1 / 6)
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय लोकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी आपला राष्ट्रध्वज फडकावावा, असा या मोहिमेचा उद्देश आहे.(HT)
भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकातामधील पारसी बागान स्क्वेअरमध्ये (ग्रीन पार्क) फडकवण्यात आला होता. त्यात लाल, पिवळे आणि हिरवे असे तीन आडवे पट्टे होते, मध्यभागी 'वंदे मातरम' लिहिलेले होते.
(2 / 6)
भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकातामधील पारसी बागान स्क्वेअरमध्ये (ग्रीन पार्क) फडकवण्यात आला होता. त्यात लाल, पिवळे आणि हिरवे असे तीन आडवे पट्टे होते, मध्यभागी 'वंदे मातरम' लिहिलेले होते.(HT)
मादाम कामा आणि त्यांच्या निर्वासित क्रांतिकारकांच्या गटानं जर्मनीमध्ये १९०७ मध्ये भारतीय ध्वज फडकवला होता. हा परदेशी भूमीवर फडकलेला पहिला भारतीय ध्वज होता.
(3 / 6)
मादाम कामा आणि त्यांच्या निर्वासित क्रांतिकारकांच्या गटानं जर्मनीमध्ये १९०७ मध्ये भारतीय ध्वज फडकवला होता. हा परदेशी भूमीवर फडकलेला पहिला भारतीय ध्वज होता.(HT)
१९१७ साली डॉ अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीचा एक भाग म्हणून नवीन ध्वज फडकावला. त्यात पाच लाल आणि चार हिरव्या आडव्या पट्टे आणि कॉन्फिगरेशनमध्ये सात चांदण्या होत्या.
(4 / 6)
१९१७ साली डॉ अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीचा एक भाग म्हणून नवीन ध्वज फडकावला. त्यात पाच लाल आणि चार हिरव्या आडव्या पट्टे आणि कॉन्फिगरेशनमध्ये सात चांदण्या होत्या.(HT)
१९२१ मध्ये बेझवाडात पिंगली व्यंकय्या आणि महात्मा गांधी भेटले होते, त्यामुळं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख समुदायांचं प्रतीक म्हणून लाल आणि हिरव्या पट्ट्यांसह ध्वजाच्या डिझाइनचा प्रस्ताव दिला होता.
(5 / 6)
१९२१ मध्ये बेझवाडात पिंगली व्यंकय्या आणि महात्मा गांधी भेटले होते, त्यामुळं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख समुदायांचं प्रतीक म्हणून लाल आणि हिरव्या पट्ट्यांसह ध्वजाच्या डिझाइनचा प्रस्ताव दिला होता.(HT)
सध्याच्या ध्वजाचा फोर्बर १९३१ मध्ये स्वीकारण्यात आला होता आणि तो भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या युद्ध चिन्ह म्हणून देखील वापरला गेला. तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानं हा ऐतिहासिक क्षण होता. यात मध्यभागी महात्मा गांधींचे चरखा असलेले भगवे, पांढरे आणि हिरवे पट्टे होते.
(6 / 6)
सध्याच्या ध्वजाचा फोर्बर १९३१ मध्ये स्वीकारण्यात आला होता आणि तो भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या युद्ध चिन्ह म्हणून देखील वापरला गेला. तिरंगा ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्यानं हा ऐतिहासिक क्षण होता. यात मध्यभागी महात्मा गांधींचे चरखा असलेले भगवे, पांढरे आणि हिरवे पट्टे होते.(HT)

    शेअर करा