मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Agnipath : अग्निपथ आंदोलनाचा असाही फटका, दिल्लीत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Agnipath : अग्निपथ आंदोलनाचा असाही फटका, दिल्लीत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Jun 20, 2022, 01:30 PMIST

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांना शमवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडसचा वापर केला आहे. मात्र त्यामुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांना शमवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडसचा वापर केला आहे. मात्र त्यामुळे दिल्लीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हे एखादं पार्किंग असावं असं पाहाता क्षणी वाटत असेल. मात्र दिल्लीकरांना अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांविरोधात, दिल्ली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडसनं, अशा प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं.
(1 / 6)
हे एखादं पार्किंग असावं असं पाहाता क्षणी वाटत असेल. मात्र दिल्लीकरांना अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या आंदोलकांविरोधात, दिल्ली पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडसनं, अशा प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं.(HT_PRINT)
गुरूग्राम इथं काँग्रेसच्या वतीनं अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडस लावून वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दिल्ली गुरूग्राम महामार्गावर या अशा लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
(2 / 6)
गुरूग्राम इथं काँग्रेसच्या वतीनं अग्निपथ योजनेला विरोध करण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेडस लावून वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दिल्ली गुरूग्राम महामार्गावर या अशा लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.(PTI)
राष्ट्रीय महामार्ग ४८ इथं ही अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडसचा फटका सर्वसामान्य दिल्लीकरांना बसला.
(3 / 6)
राष्ट्रीय महामार्ग ४८ इथं ही अशी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेडसचा फटका सर्वसामान्य दिल्लीकरांना बसला.(PTI)
गोल मेथी जंक्शन, क्यू पॉइंट जंक्शन, तुघलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन अशा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
(4 / 6)
गोल मेथी जंक्शन, क्यू पॉइंट जंक्शन, तुघलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन अशा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.(PTI)
गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी प्रवास करताना काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. मेहरुली गुरुग्राम रोड,कुंडी मनेसर पालवार एक्स्प्रेस वे आणि गुरुग्राम फरीदाबाद रस्ता यांचा अवलंब करावा असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.
(5 / 6)
गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी प्रवास करताना काही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. मेहरुली गुरुग्राम रोड,कुंडी मनेसर पालवार एक्स्प्रेस वे आणि गुरुग्राम फरीदाबाद रस्ता यांचा अवलंब करावा असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.(PTI)
दिल्ली वाहतूक पोलीसांनी एक ट्विट करुन बसेसची वाहतूक नवी दिल्लीतल्या गोल डाक खाना जंक्शन, तीन मारुती चौक, पृथ्वीराज रोड, पटेल चौक अशा ठिकाणापासून आत जाणार नसल्याचं सांगितलं आहे. 
(6 / 6)
दिल्ली वाहतूक पोलीसांनी एक ट्विट करुन बसेसची वाहतूक नवी दिल्लीतल्या गोल डाक खाना जंक्शन, तीन मारुती चौक, पृथ्वीराज रोड, पटेल चौक अशा ठिकाणापासून आत जाणार नसल्याचं सांगितलं आहे. (PTI)

    शेअर करा