मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Beating Retreat: बीटिंग रिट्रीट सोहळ्यात होणार सर्वात मोठा ड्रोन शो

Beating Retreat: बीटिंग रिट्रीट सोहळ्यात होणार सर्वात मोठा ड्रोन शो

Jan 29, 2023, 08:08 AMIST

Beating Retreat show : बीटिंग रिट्रीट सोहळ्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची सांगता होणार आहे. या सोहळ्यात आज देशातील सर्वात मोठा ड्रोन शो होणार आहे. या शोमध्ये तब्बल ३.५०० स्वदेशी ड्रोनचा वापर केला जाणार असून त्यांच्या माध्यमातून आकाशात विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.

  • Beating Retreat show : बीटिंग रिट्रीट सोहळ्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची सांगता होणार आहे. या सोहळ्यात आज देशातील सर्वात मोठा ड्रोन शो होणार आहे. या शोमध्ये तब्बल ३.५०० स्वदेशी ड्रोनचा वापर केला जाणार असून त्यांच्या माध्यमातून आकाशात विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.
चार दिवस चालणार्‍या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपासाठी दरवर्षी २९ जानेवारी रोजी  राजधानी दिल्लीतील विजय चौक येथे 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी, भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित थीम ठेवण्यात आली असून यावर तब्बल  ३, ५०० ड्रोन आकाशात विविध कलाकृती सादर करणार आहेत.  
(1 / 8)
चार दिवस चालणार्‍या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपासाठी दरवर्षी २९ जानेवारी रोजी  राजधानी दिल्लीतील विजय चौक येथे 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी, भारतीय शास्त्रीय रागांवर आधारित थीम ठेवण्यात आली असून यावर तब्बल  ३, ५०० ड्रोन आकाशात विविध कलाकृती सादर करणार आहेत.  (PTI)
संरक्षण मंत्रालयानुसार, लष्कर, नौदल, हवाई दल आणि राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांच्या संगीत बँडद्वारे २९ मनमोहक आणि पाय-टॅपिंग भारतीय संगीत ध्वनीचे यावेळी सादरीकरण केले जाणार आहे.  
(2 / 8)
संरक्षण मंत्रालयानुसार, लष्कर, नौदल, हवाई दल आणि राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांच्या संगीत बँडद्वारे २९ मनमोहक आणि पाय-टॅपिंग भारतीय संगीत ध्वनीचे यावेळी सादरीकरण केले जाणार आहे.  (PTI)
Botlabs Dynamics द्वारे आयोजित केलेला ड्रोन शो मध्ये ३ हजार ५००  ड्रोनचा वापर केला जाणार असून या माध्यमातून आकाशात विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.  
(3 / 8)
Botlabs Dynamics द्वारे आयोजित केलेला ड्रोन शो मध्ये ३ हजार ५००  ड्रोनचा वापर केला जाणार असून या माध्यमातून आकाशात विविध कलाकृती सादर केल्या जाणार आहेत.  (PTI)
या शोच्या माध्यमातून देशातील  स्टार्टअप इकोसिस्टमचे यश, आणि देशातील तरुणांचे तांत्रिक पराक्रमाचे सादरी करण केले जाणार आहे.  
(4 / 8)
या शोच्या माध्यमातून देशातील  स्टार्टअप इकोसिस्टमचे यश, आणि देशातील तरुणांचे तांत्रिक पराक्रमाचे सादरी करण केले जाणार आहे.  (PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. 
(5 / 8)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. (PTI)
प्रथमच, उत्तर आणि दक्षिण ब्लॉकच्या दर्शनी भागावर बीटिंग रिट्रीट सोहळ्या दरम्यान 3D अॅनामॉर्फिक प्रोजेक्शन आयोजित करण्यात आले आहेत. 
(6 / 8)
प्रथमच, उत्तर आणि दक्षिण ब्लॉकच्या दर्शनी भागावर बीटिंग रिट्रीट सोहळ्या दरम्यान 3D अॅनामॉर्फिक प्रोजेक्शन आयोजित करण्यात आले आहेत. (PTI)
बीटिंग रिट्रीट समारंभाची सुरवात ही १९५०  च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आली.  जेव्हा भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट्सने मास बँडद्वारे प्रदर्शनाचा अनोखा समारंभ सुरू केला. 
(7 / 8)
बीटिंग रिट्रीट समारंभाची सुरवात ही १९५०  च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आली.  जेव्हा भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट्सने मास बँडद्वारे प्रदर्शनाचा अनोखा समारंभ सुरू केला. (PTI)
जेव्हा सैन्याने लढाई थांबवली, शस्त्रे म्यान केली आणि युद्धभूमीतून माघार घेतली तेव्हा  रिट्रीटच्या आवाजात सूर्यास्ताच्या वेळी सैनिक हे छावण्यांमध्ये परतले. त्या आधारावर ही  शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा बीटिंग रिट्रीटच्या माध्यमातून बदलण्यात आली.   
(8 / 8)
जेव्हा सैन्याने लढाई थांबवली, शस्त्रे म्यान केली आणि युद्धभूमीतून माघार घेतली तेव्हा  रिट्रीटच्या आवाजात सूर्यास्ताच्या वेळी सैनिक हे छावण्यांमध्ये परतले. त्या आधारावर ही  शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा बीटिंग रिट्रीटच्या माध्यमातून बदलण्यात आली.   (PTI)

    शेअर करा