मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पंढरीची वारी जयाची अधुरी! हरिनामाच्या गजरात दंग झाले 'हे' मराठमोळे कलाकार

पंढरीची वारी जयाची अधुरी! हरिनामाच्या गजरात दंग झाले 'हे' मराठमोळे कलाकार

Jun 28, 2022, 08:47 PMIST

वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालावा यासाठी काही मराठमोळे कलाकार वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करताना दिसले.

  • वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालावा यासाठी काही मराठमोळे कलाकार वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करताना दिसले.
आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी असा मोह मराठी माणसाला नक्कीच होतो. टाळ मृदूंगाच्या गजरात बेधुंद होऊन नाचणारे वारकरी पाहिले की खरी तल्लीनता काय असते हे याची जाणीव होते. प्रचंड जनसमुदाय एका विठुरायाला भेटण्यासाठी कित्येक दिवसांची पायपीट करून पंढरीत दाखल होतो. मनात एकमेकांविषयी द्वेष भावना न ठेवता भेदभाव न मानता छोट्यामोठ्यांसमोर नतमस्तक होतात. ही सर्व वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि वाढली. वारकरी संप्रदायाचा हा वसा पुढे चालवणाऱ्यासाठी काही मराठमोळे कलाकार वारीत सहभागी होऊन त्यांची सेवा करताना दिसले. काहींनी वारकऱ्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त केला तर काहींनी त्यांच्या थकलेल्या पायाला तेल लावून दिलं. पाहूया अशा काही कलाकारांचे फोटो.
(1 / 12)

लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी याने देहू येथे तुकोबारायांची पालखी मुक्कामी असताना वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
(2 / 12)

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने झी टॉकीज वरील कार्यक्रम 'गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा' या कार्यक्रमाचं चित्रीकरण करताना वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद घेतला.
(3 / 12)

तिने त्यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या.
(4 / 12)
तिने त्यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या.
लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी हिने एका संस्थेमार्फत वारकऱ्यांना भोजन व इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास मदत केली.
(5 / 12)

हा सोहळा अनुभवता आला म्हणून पोस्ट करत तिने देवाचे आभारही मानले.
(6 / 12)
हा सोहळा अनुभवता आला म्हणून पोस्ट करत तिने देवाचे आभारही मानले.
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने देखील वारीचा आनंद घेतला.
(7 / 12)
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने देखील वारीचा आनंद घेतला.
प्राजक्ताचा वारीतील टाळ वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.
(8 / 12)
प्राजक्ताचा वारीतील टाळ वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.
अभिनेता संदीप पाठक यानेही वारीत हजेरी लावली.
(9 / 12)
अभिनेता संदीप पाठक यानेही वारीत हजेरी लावली.
वारकऱ्यांसोबत संवाद साधत साधतानाचे काही फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
(10 / 12)
वारकऱ्यांसोबत संवाद साधत साधतानाचे काही फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
'गाढवाचं लग्न' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी हिने देखील शुचीकृत्य संस्थेच्या मार्फत काम करून वारकऱ्यांची सेवा केली.
(11 / 12)

तिने शेअर केलेल्या व्हिडिओत कश्मिरा वारकऱ्यांच्या पायाला तेल लावताना दिसत आहे. सोबतच तिने सगळ्यांसाठी एका मेडिकल कॅम्पचं देखील आयोजन केलं होतं.
(12 / 12)

    शेअर करा