मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Langya Virus : कोरोनानंतर आता चीनमध्ये लांग्या व्हायरसचा कहर; ३५ रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली!

Langya Virus : कोरोनानंतर आता चीनमध्ये लांग्या व्हायरसचा कहर; ३५ रुग्ण सापडल्यानं चिंता वाढली!

Aug 11, 2022, 04:42 PMIST

New Langya Virus in China : चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपाव्हायरसचा संसर्ग असलेल्या ३५ रुग्णांची ओळख झाली असून त्यामुळं आता कोरोनानंतर जगभरात लांग्या लांग्या व्हायरस पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

New Langya Virus in China : चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपाव्हायरसचा संसर्ग असलेल्या ३५ रुग्णांची ओळख झाली असून त्यामुळं आता कोरोनानंतर जगभरात लांग्या लांग्या व्हायरस पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या नावाचा विषाणू सापडला आहे, हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ झाल्याची माहिती आहे. याशिवाय या विषाणूचे अनेक रुग्ण चीनमध्ये सापडत असल्यानं जगाची चिंता वाढली आहे.
(1 / 6)
चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या नावाचा विषाणू सापडला आहे, हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ झाल्याची माहिती आहे. याशिवाय या विषाणूचे अनेक रुग्ण चीनमध्ये सापडत असल्यानं जगाची चिंता वाढली आहे.(REUTERS)
पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातील स्वॅबच्या नमुन्यांमध्ये लांग्या विषाणू आढळून आला असल्याचं वृत्त चीनचं सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलं आहे.
(2 / 6)
पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातील स्वॅबच्या नमुन्यांमध्ये लांग्या विषाणू आढळून आला असल्याचं वृत्त चीनचं सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सनं दिलं आहे.(REUTERS)
लांग्या हा विषाणू प्राण्यांमधून माणसांत आल्याचं चीनमध्ये जारी करण्यात आलेल्य एका वैद्यकीय अहवालात सांगण्यात आलं आहे. परंतु त्याचा धोका कोरोनाच्या तुलनेत किती असणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
(3 / 6)
लांग्या हा विषाणू प्राण्यांमधून माणसांत आल्याचं चीनमध्ये जारी करण्यात आलेल्य एका वैद्यकीय अहवालात सांगण्यात आलं आहे. परंतु त्याचा धोका कोरोनाच्या तुलनेत किती असणार, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.(Bloomberg)
चीनमध्ये सापडलेल्या ३५ रुग्णाच्या जवळच्या लोकांना किंवा कुटुंबातील लोकांना या विषाणूची बाधा झालेली नाही. त्यामुळं या आजाराचं संक्रमण नेमकं कोणत्या मार्गानं होत आहे, याचा शोध घेतला जात आहे.
(4 / 6)
चीनमध्ये सापडलेल्या ३५ रुग्णाच्या जवळच्या लोकांना किंवा कुटुंबातील लोकांना या विषाणूची बाधा झालेली नाही. त्यामुळं या आजाराचं संक्रमण नेमकं कोणत्या मार्गानं होत आहे, याचा शोध घेतला जात आहे.(Bloomberg)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचाही उगम चीनच्या वूहान शहरातूनच झाला होता. त्यामुळं आता लांग्या विषाणू हा जगासाठी कितपत घातक ठरणार, याचा शोध घेतला जात आहे.
(5 / 6)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचाही उगम चीनच्या वूहान शहरातूनच झाला होता. त्यामुळं आता लांग्या विषाणू हा जगासाठी कितपत घातक ठरणार, याचा शोध घेतला जात आहे.(Bloomberg)
लांग्या विषाणूचे रुग्ण चीनमध्ये सापडत असले तरी आता या रोगावर, विषाणूवर अजून तरी कोणतं औषध किंवा लस तयार करण्यात आलेली नाही. परंतु चीनमध्ये सापडत असलेल्या लांग्याच्या रुग्णांनी जगाची चिंता मात्र वाढली आहे.
(6 / 6)
लांग्या विषाणूचे रुग्ण चीनमध्ये सापडत असले तरी आता या रोगावर, विषाणूवर अजून तरी कोणतं औषध किंवा लस तयार करण्यात आलेली नाही. परंतु चीनमध्ये सापडत असलेल्या लांग्याच्या रुग्णांनी जगाची चिंता मात्र वाढली आहे.(REUTERS)

    शेअर करा