मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Engineering Marvel: काश्मिरमधील चिनाब नदीवर ‘आयफेल टॉवर’ पेक्षा उंच पूल

Engineering Marvel: काश्मिरमधील चिनाब नदीवर ‘आयफेल टॉवर’ पेक्षा उंच पूल

HT Marathi Desk HT Marathi

Aug 05, 2022, 07:36 PM IST

    • जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आकाराला येतोय. पॅरिस येथील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने हा पूल अधिक उंच असणार आहे.
जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील अदभूत पूल

जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आकाराला येतोय. पॅरिस येथील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने हा पूल अधिक उंच असणार आहे.

    • जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आकाराला येतोय. पॅरिस येथील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने हा पूल अधिक उंच असणार आहे.

जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या चिनाब नदीवर जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आकाराला येतोय. हा पूल पूर्ण झाल्यानंतर भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. या महिन्यात या पूलाचे अभियांत्रिकी काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने हा पूल अधिक उंच असणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

जम्मू आणि काश्मिरच्या रियासी जिल्ह्यात कौरी गावाजवळ सलाल धरणाच्या वरच्या बाजूला या पूलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. मुंबईस्थित पायाभूत अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जगातील सर्वात उंच अशा या रेल्वे पूलाच्या लोखंडी कमानीचे काम पूर्ण झाले. चिनाब नदीच्या पात्रापासून ३५९ मीटर उंचीवरील पूलाच्या ओव्हरआर्च डेक लॉन्चिंग गोल्डन जॉइंट (Golden Joint) चे काम सध्या सुरू आहे. हा पूल जम्मू - उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पामुळे जम्मू-काश्मिरमधील दुर्गम भाग देशाच्या इतर भागाशी जोडला जाणार आहे.

तब्बल १३१५ मीटर लांबीच्या चिनाब रेल्वे पूलाच्या बांधकामात सुमारे ३०,३५० मेट्रिक टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. तर कमान उभारण्यासाठी १०,६२० मेट्रिक टन लोखंड वापरण्यात आले आहे. पूलाचे डेक उभारणीसाठी १४,५०४ मेट्रिक टन लोखंड वापरण्यात आले आहे.

‘या अभियांत्रिकी कामात प्रत्येक अभियंता आणि कामगाराने अत्युच्च कामगिरी करून मोलाचे योगदान दिले आहे. पूलाचा गोल्डन जॉइंट भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णपर्वाची सुरुवात करून जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय बनणार आहे. या पूलाचे बांधकाम आणि अभियांत्रिकी कार्य हे संपूर्णपणे भारतीय अभियंत्यांनी केले आहे. परिणामी चिनाब रेल्वे ब्रीज प्रकल्प हा एक आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे’, असे मत अ‍ॅफकॉन्सचे उप व्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन यांनी यावेळी व्यक्त केले.

चिनाब पूलामध्ये ९३ डेक सेगमेंट असून प्रत्येक सेग्मेंटचे वजन ८५ टन आहे. हे डेक सेग्मेंट दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले असून पाच प्रगतीपथावर आहेत. कमानीचे दोन टोक एकत्रित मिळतील त्यास गोल्डन ज्वाइंट म्हणतात. गोल्डन ज्वाइंटचे काम पूर्ण झाल्यावर चिनाब नदीवरील हा पूल पूर्ण होणार आहे.

 

विभाग