मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime News : बाऊन्सर्सची दादागिरी; महिलेचा विनयभंग करत सात जणांना चोपलं; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल!

Crime News : बाऊन्सर्सची दादागिरी; महिलेचा विनयभंग करत सात जणांना चोपलं; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल!

Aug 11, 2022, 03:38 PM IST

    • Crime News Today : सध्याच्या काळात अनेक लोक सुरक्षेसाठी बाऊन्सर्स ठेवत असतात, परंतु क्लबमध्ये गेलेल्या एका महिलेचा विनयभंग करत बाऊन्सर्सनीच दादागिरी करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Gurugram Crime News Today (HT)

Crime News Today : सध्याच्या काळात अनेक लोक सुरक्षेसाठी बाऊन्सर्स ठेवत असतात, परंतु क्लबमध्ये गेलेल्या एका महिलेचा विनयभंग करत बाऊन्सर्सनीच दादागिरी करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    • Crime News Today : सध्याच्या काळात अनेक लोक सुरक्षेसाठी बाऊन्सर्स ठेवत असतात, परंतु क्लबमध्ये गेलेल्या एका महिलेचा विनयभंग करत बाऊन्सर्सनीच दादागिरी करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Gurugram Crime News Today : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली राजधानी क्षेत्रातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गाझीयाबादेतील हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच आता गुरुग्राममध्ये बाऊन्सर्सनी गुंडगिरी करत हाणामारी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता या बाऊन्सर्सवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जायेत खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला ही गुरुग्राममधील एका क्लबमध्ये गेली होती, तेव्हा ती आत शिरत असताना एका बाऊन्सरनं तिच्यासोबत अभद्र व्यवहार केला. त्यामुळं संतापलेल्या महिलेनं या कृत्याचा निषेध करताच महिलेसोबत असलेल्या सात मित्रांचा बाऊन्सर्ससोबत वाद झाला, त्यानंतर महिलेसह सात जणांना बाऊन्सर्सच्या ग्रुपनं बेदम मारहाण केली आहे, त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये १० ते १२ बाऊन्सर्स एका महिलेसह सात तरुणांना मारहाण करत असल्याचं दिसत आहे. ही घटना घडल्यानंतर बाऊन्सर्सनी १२ हजार रुपये आणि महिलेच्या मित्रांचे घड्याळ चोरल्याचा आरोप महिलेनं केला आहे. त्यामुळं या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच उद्योग विहार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची चौकशी केल्यानंतर १२ बाऊन्सर्सवर गुन्हा दाखल केला आहे.

विभाग