मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad : घरातल्याच व्यक्तीनं केला बलात्कार; गर्भवती तरुणीनं फवारणीचं औषध घेऊन केली आत्महत्या

Aurangabad : घरातल्याच व्यक्तीनं केला बलात्कार; गर्भवती तरुणीनं फवारणीचं औषध घेऊन केली आत्महत्या

Aug 11, 2022, 10:33 AM IST

    • Aurangabad Crime News : गेल्या वर्षभरापासून भावकीतील व्यक्तीच कुटुंबातील तरुणीवर बलात्कार करत होता, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानं आईनं याबाबत विचारणा केल्यानंतर प्रकरणाचं बिंग फुटलं आहे.
Aurangabad Crime News (HT_PRINT)

Aurangabad Crime News : गेल्या वर्षभरापासून भावकीतील व्यक्तीच कुटुंबातील तरुणीवर बलात्कार करत होता, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानं आईनं याबाबत विचारणा केल्यानंतर प्रकरणाचं बिंग फुटलं आहे.

    • Aurangabad Crime News : गेल्या वर्षभरापासून भावकीतील व्यक्तीच कुटुंबातील तरुणीवर बलात्कार करत होता, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानं आईनं याबाबत विचारणा केल्यानंतर प्रकरणाचं बिंग फुटलं आहे.

Aurangabad Crime News : राज्यात भंडारा जिल्ह्यातील बलात्काराचं प्रकरण गाजत असतानाच आता औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. भावकीतल्याच व्यक्तीनं बलात्कार केल्यानं गर्भवती राहिलेल्या तरुणीनं विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळं नात्याला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून भावकीतील व्यक्तीनंच बलात्कार केल्यानं पिडितेच्या कुटंबाला मोठा धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

परभणीत ऑनर किलिंग..! प्रेम विवाहाला विरोध करत आई-बापाने पोटच्या मुलीचा केला ‘सैराट’ अंत

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या माळीसागज येथील भावकील्याच एका तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी आणि पिडित तरुणी हे भाऊबंद असल्यानं त्यांचं एकमेकांच्या घरी सतत येणं जाणं होतं, नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा पिडितेची आई घराबाहेर गेलेली असता आरोपीनं घरात एकटी असलेल्या तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणी गर्भवतीही राहिली, त्याची विचारणा आईनं केल्यानंतर पिडितेनं हा सर्व प्रकार आईला सांगितला, त्यानंतर पिडित मुलीनं फवारणीचं औषध पिऊन आत्महत्या केली आहे.

भावकीतलाच आहे आरोपी...

आरोपी हा भावकीतलाच असल्यानं पिडित तरुणीनं त्याला घरात येऊ दिलं होतं, ती घरात एकटी असल्याचं पाहून आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला होता. इतकंच नाही तर याबाबत कुणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळं गेली नऊ महिने पिडितेनं या प्रकाराबाबतची माहिती कुणालाही दिली नव्हती. परंतु आरोपीनं वारंवार ब्लॅकमेल करून बलात्कार केल्यानं तरुणी गर्भवती राहिली होती.

पिडितेनं विष पिऊन केली आत्महत्या...

पिडित तरुणी ही आरोपीनं केलेल्या बलात्कारामुळं गर्भवती राहिल्याचं तिच्या आईला कळालं होतं. याशिवाय पिडितेसोबत झालेला सर्व प्रकार तिनं तिच्या आईला सांगितला होता. त्यामुळं आता समाजात बदनामी होईल, या भीतीनं पिडितेनं फवारणीचं औषध घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पिडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी प्रसंगावधान राखत केली कारवाई...

आरोपी तरुण आणि पिडित तरुणी हे दोन्ही कुटुंबातील म्हणजेच भावकीतील असल्यानं गावात वाद होण्याची शक्यता होती, त्यामुळं वीरगाव पोलिसांनी गावात राडा होऊ नये म्हणून मृत तरुणीला सरकारी दवाखान्यात हलवलं आणि गुन्हा दाखल होताच आरोपी नराधमाला अटक केली, त्यामुळं आता या घटनेत पोलिसांनी पुढील कारवाई करायला सुरुवात केली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा