मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambadas Danve : अंबादास दानवेंच्या निवडीला आक्षेप; काँग्रेस नेते शिवसेनेवर भडकले, म्हणाले…

Ambadas Danve : अंबादास दानवेंच्या निवडीला आक्षेप; काँग्रेस नेते शिवसेनेवर भडकले, म्हणाले…

Aug 11, 2022, 10:28 AM IST

    • Maharashtra Legislative Council Opposition Leader: शिवसेनेचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवास झाली. त्यांच्या या निवडीवर कॉँग्रेसने शिवसेनेने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत दानवे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.
congress-shivsena

Maharashtra Legislative Council Opposition Leader: शिवसेनेचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवास झाली. त्यांच्या या निवडीवर कॉँग्रेसने शिवसेनेने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत दानवे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.

    • Maharashtra Legislative Council Opposition Leader: शिवसेनेचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी निवास झाली. त्यांच्या या निवडीवर कॉँग्रेसने शिवसेनेने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत दानवे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.

Congress on MLC Opposition Leader: मंत्री मंडळ विस्तारानंतर महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने ९ ऑगस्ट रोजी अधिसूचना काढत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेला मान्यता देत शिवसेनेचे अंबदास दानवे यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच दानवे यांची निवड करण्यात आल्याचे शिवसनेने सांगितले होते. विधान परिषेतील संख्याबळ आमच्या कडे आहे, तसेक महाविकास आघाडीत समन्वय आहे, असे अरविंद सावंत म्हणाले होते. मात्र, असे असतांनाही कॉँग्रेसने मात्र यावर आक्षेप घेतला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेने निवडी आधी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मुंबईतील करी रोड, माटुंगा, महालक्ष्मी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार, जाणून घ्या कारण

Mumbai Dry days List: मुंबईत 'या' महिन्यात कोणकोणत्या दिवशी मिळणार नाही दारू, किती दिवस दुकान बंद?

mumbai water cut : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर व्हावे लागले होते. यानंतर शिंदे यांनी भाजपच्या पाठबळवर सत्ता मिळवली. त्यांतर ४० दिवसांनी मंत्री मंडल विस्तार झाला. याच दिवशी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही असे म्हणाले, तर ही निवड आम्हाला मान्य नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर शिवसेनेचे अंबदास दानवे यांची निवड करण्यात आली. या निवडीवर आमचा आक्षेप आहे. आम्हाला ही निवड मान्य नसल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅली निमित्त बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

तर बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका होती. संख्याबळ पाहता सर्व समान असल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद ने कॉंग्रेसलाच मिळणे अपेक्षित होते. मात्र, आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. याबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असून या याबाबत चर्चा होईल. निवडीआधी शिवसेनेने आम्हाला विचारणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी चर्चा केली नाही. आम्ही जर मित्र आहोत, आघाडी आहे तर एकामेकांशी बोललं पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, कॉंग्रेसच्या नाराजीमुळे महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कॉंग्रेस या बैठकीत काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या