मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIRAL VIDEO : हॉटेलमध्ये पोरींचा तुफान राडा; एकटीनं दोघींना फिल्मी स्टाईलनं चोपलं!

VIRAL VIDEO : हॉटेलमध्ये पोरींचा तुफान राडा; एकटीनं दोघींना फिल्मी स्टाईलनं चोपलं!

Aug 10, 2022, 02:46 PM IST

    • Viral On Social Media : क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये तरुण पोरींनी तुफान राडा केला आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Viral On Social Media (HT)

Viral On Social Media : क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये तरुण पोरींनी तुफान राडा केला आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    • Viral On Social Media : क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये तरुण पोरींनी तुफान राडा केला आहे. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral On Social Media : फक्त मुलंच भांडणं किंवा हाणामारी करतात, असं नाही. अनेकदा नळावर किंवा मुंबईच्या लोकलमध्ये तुम्ही मुलींच्या हाणामारीचे किंवा भांडण झालेले व्हिडिओ पाहिलेले असतील, मुली या अगदी क्षुल्लक कारणावरून भांडतात, अशाच एका क्षुल्लक कारणावरून हॉटेलमध्ये बसलेल्या मुलींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत असून त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Nepal ban Indian Spices : सिंगापूर, हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतीय मसाल्यांवर घातली बंदी

Viral News : आधी सेक्ससाठी बोलावले! मग वस्तऱ्याने कापले लिंग! पत्नीने केले पतीसोबत भयंकर कृत्य

Amit Shah : बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी काय असेल?; अमित शहा काय म्हणाले पाहा!

Tejas MK1A : पाकिस्तानला फुटणार घाम! भारतीय हवाईदलाला मिळणार पहिले तेजस Mk-1A लढाऊ विमान, जाणून घ्या खासियत

@ViciousVideos या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, एका हॉटेलमध्ये तिन मैत्रिणी बसलेल्या होत्या, परंतु त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाला, त्यामुळं त्यांच्यात वाद इतका वाढला की त्या एकमेकांना शिव्या देऊ लागल्या, सुरुवातीला खाली बसलेल्या एका तरुणीनं हे सर्व प्रकरण शांतपणे ऐकून घेतलं परंतु जेव्हा तिला राग आला तेव्हा ती आउट ऑफ कंट्रोल झाली आणि एकटीनं दोन तरुणींना फिल्मी स्टाईनं चोप दिला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुणी या एका तरुणीला हॉटेलमधून बाहेर जायला सांगत होत्या, ती एकटी तरुणी या दोघींशी बोलत होती, परंतु दोन तरुणी तिच्यासोबत उद्धटपणे बोलत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. परंतु काही वेळानं त्या दोन तरुणी तिला काही तरी बोलतात, त्यामुळं एकट्या तरुणीला प्रचंड राग येतो आणि ती दोघींवर हल्ला चढवते.

एकटी तरुणी इतर दोन तरुणींना ज्या पद्धतीनं मारत आहे, ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हाणामारी झाल्यानंतर हॉटेलमध्ये बसलेले काही लोक आणि कर्मचारी मारहाण करणाऱ्या तरुणीला बाजूला करतात आणि तिघींना बाहेर काढतात. परंतु या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक सोशल मीडिया युजर्सनं या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

विभाग

पुढील बातम्या