मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Murder Case : कराटे मास्टर पत्नीनं होमगार्ड पतीचे हात-पाय तोडून जाळले; धक्कादायक घटनेनं वर्धा हादरलं

Murder Case : कराटे मास्टर पत्नीनं होमगार्ड पतीचे हात-पाय तोडून जाळले; धक्कादायक घटनेनं वर्धा हादरलं

Aug 10, 2022, 02:14 PM IST

    • Wardha Murder Case : आरोपी पत्नीनं पतीच्या शरीराचे तुकडे करून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु शीर न जळाल्यानं त्याला रेल्वे परिसरात फेकून ती फरार झाली.
Wardha Murder Case (HT_PRINT)

Wardha Murder Case : आरोपी पत्नीनं पतीच्या शरीराचे तुकडे करून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु शीर न जळाल्यानं त्याला रेल्वे परिसरात फेकून ती फरार झाली.

    • Wardha Murder Case : आरोपी पत्नीनं पतीच्या शरीराचे तुकडे करून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु शीर न जळाल्यानं त्याला रेल्वे परिसरात फेकून ती फरार झाली.

Wardha Crime News : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर चंद्रपूरात एका आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यातच आता वर्धा जिल्ह्यात पत्नीनं पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पत्नीनं होमगार्ड असलेल्या पतीचे हात-पाय तोडून त्याचे तुकडे जाळण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शीर पूर्ण जळालं नाही म्हणून त्याला रेल्वे परिसरात फेकून आरोपी महिला पसार झाली आहे. आरोपी महिलेचं मनीषा बेंदले नाव असून मृत पतीचं नाव अनिल बेंदले (४६) आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Bhiwandi Accident: भिवंडीत कारच्या धडकेत ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, देवळी तालुक्यातील पुलगावच्या हिंगणघाट फैलमध्ये राहणाऱ्या अनिल आणि मनीषा यांच्या संसारात काहीच ठिक होत नव्हतं, त्यांच्यात सातत्यानं वाद होत होते, परंतु काल रात्री त्यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्यानं संतापलेल्या पत्नीनं पती अनिलचे आधी हात पाय तोडले आणि नंतर त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पतीचं शीर जळत नसल्यानं मनीषानं ते रेल्वे परिसरात फेकून दिलं. परंतु काही स्थानिक लोकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पती होता होमगार्ड...

मनीषाचा मृतक पती हा होमगार्ड होता, परंतु काही दिवसांपूर्वीच त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळं तो सातत्यानं दारू पित होता, त्यामुळं त्याची पत्नी त्याला वैतागली होती. दारू पिऊन आल्यानंतर अनिल हा पत्नी मनिषाला त्रास देत होता, त्यामुळंच पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

आरोपी मनिषा आहे कराटे प्लेयर...

आरोपी मनिषा ही कराटे प्लेयर असून तिनं महाविद्यालयीन जीवनात कराटे शिकल्याची माहिती आहे. त्यामुळं पतीला मारण्यासाठीही तिनं कराटेचे स्टेप्स वापरल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून मनिषा आणि त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात अनिल सोबत नेमकं काय झालं, हे पुढील तपासातूनच उघड होणार आहे.

भयावह हत्याकांडामुळं जिल्ह्यात खळबळ...

पोलिसांनी मृतक अनिलच्या बॉडीचे अवशेष गोळा करून त्याला फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे, त्यामुळं आता त्याची हत्या कशा प्रकारे करण्यात आली ते यातून सिद्ध होणार आहे. परंतु वर्ध्यात झालेल्या या हत्याकांडामुळं लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळसिंग पाटील हे करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या