मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rape Case : ब्लॅकमेल करून प्रेयसीचा बलात्कार; बॉयफ्रेंडनं व्हिडिओ बनवून मित्रांच्या रुममध्ये...

Rape Case : ब्लॅकमेल करून प्रेयसीचा बलात्कार; बॉयफ्रेंडनं व्हिडिओ बनवून मित्रांच्या रुममध्ये...

Aug 10, 2022, 12:56 PM IST

    • Crime News : प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
UP Crime News (HT_PRINT)

Crime News : प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Crime News : प्रेयसीला हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

UP Crime News : दिल्लीलगत असलेल्या गाझीयाबादमधील हत्या आणि बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गृहजिल्ह्यातच धक्कादायक घटना घडली आहे. गोरखपूरमध्ये बॉयफ्रेंडनं त्याच्या गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये बोलावून आधी बलात्कार केला, त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत मित्रांच्या रुममध्ये जाण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी बॉयफ्रेंड हा गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करून गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार करत असल्याची संतापजनक घडना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

नेमकं प्रकरण काय?

गोरखपूरमध्ये आरोपी बॉयफ्रेंडनं त्याच्या गर्लफ्रेंडला गेल्या दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करून बलात्कार करत होता, आता त्यानं प्रेयसीला शहरातल्या एका हॉटेलमध्ये बोलावलं, त्यात त्यानं प्रेससीचा बलात्कार केल्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवला आणि मित्रांच्या खोलीत जाण्यास सांगितलं, जेव्हा पिडित तरुणीनं हे करण्यास नकार दिला तर आरोपी प्रियकरानं मुलीच्या गावात न्यूड व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामुळं आता आरोपीविरोधात युपीतील चौरीचौरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या कुशीनगरमध्ये राहणाऱ्या मंजेश गुप्तानं एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं होतं, त्यानं तिला सातत्यानं हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर सेक्स करतानाचे व्हिडिओ शूट करून तिला मागील दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करत तिचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जेव्हा पिडितेनं बॉयफ्रेंडला न्यूड व्हिडिओ डिलीट करायला सांगितले तेव्हा आरोपी गुप्तानं पिडितेला गोरखपूरमधील अनमोल हॉटेलमध्ये बोलावलं, त्यानंतर तिचा बलात्कार करून त्याच्या मित्रांच्या खोलीत जायला सांगितलं, परंतु मुलीनं नकार दिल्यानंतर त्यानं सर्व व्हिडिओज मुलीच्या गावात व्हायरल केले आहेत. या सर्व घटनेची माहिती पिडित मुलीच्या वडिलांना कळताच त्यांनी चौरीचौरा पोलीस ठाण्यात आरोपी गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जिल्ह्याच्या एसपींनी आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील बातम्या