मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mirchi Baba : विभूती देऊन विवाहितेचा बलात्कार; आरोपी मिर्ची बाबाला ग्वाल्हेरमधून अटक!

Mirchi Baba : विभूती देऊन विवाहितेचा बलात्कार; आरोपी मिर्ची बाबाला ग्वाल्हेरमधून अटक!

Aug 10, 2022, 01:44 PM IST

    • Mirchi Baba Arrested : मुल होत नसल्यानं एका विवाहितेनं प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ ​​महंत वरग्यानंद गिरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मिर्ची बाबानं विवाहितेला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Mirchi Baba Arrested In Gwalior (HT)

Mirchi Baba Arrested : मुल होत नसल्यानं एका विवाहितेनं प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ ​​महंत वरग्यानंद गिरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मिर्ची बाबानं विवाहितेला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    • Mirchi Baba Arrested : मुल होत नसल्यानं एका विवाहितेनं प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ ​​महंत वरग्यानंद गिरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी मिर्ची बाबानं विवाहितेला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Mirchi Baba Arrested In Gwalior : अपत्य होत नाही म्हणून एका विवाहितेनं प्रसिद्ध मिर्ची बाबा उर्फ ​​महंत वरग्यानंद गिरी यांची भेट घेतली, परंतु मिर्ची बाबानंच तिला विभूती देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून आता आणखी एका भोंदुबाबाचा कारनामा उघड झाल्यानं या घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : चौथ्या मजल्यावर पडता पडला बचावला चिमुकला, तु काय करत होती? ट्रोलिंगला कंटाळून आईने संपवले आयुष्य

तेंदूच्या पानांची वाहतूक करणारे पिकअप वाहन दरीत कोसळले, १८ जणांचा मृत्यू; ४ जण जखमी

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

काय आहे नेमकं प्रकरण?

एका विहाहितेला अनेक प्रयत्न करूनही अपत्य होत नसल्यानं तिनं याबाबत मिर्ची बाबाची भेट घेतली होती. त्यावेळी मिर्ची बाबानं विवाहितेला विभूती खायला दिली, त्यामुळं महिला बेशुद्ध झाली, या संधीचा फायदा घेत भोंदुबाबानं महिलेवर बलात्कार केला, जेव्हा महिला शुद्धीत आली तेव्हा तिला तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिनं या सर्व प्रकरणाची तक्रार महिला गुन्हे शाखेकडे केल्यानंतर आरोपी मिर्ची बाबाला ग्वाल्हेरमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

मिर्ची बाबानं महिलेला जीवे मारण्याची दिली धमकी...

मिर्ची बाबानं केलेल्या अत्याचारानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी भोंदुबाबाविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचं मिर्ची बाबाला कळताच त्यानं महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याशिवाय बलात्कार केल्यानंतरही त्यानं पिडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु त्यावेळी घाबरलेल्या महिलेनं या घटनेची माहिती कुणालाही दिली नव्हती.

पोलिसांनी मिर्ची बाबाला केली अटक...

पिडित महिलेनं केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिर्ची बाबाला अटक केली असून महिला क्राइम ब्रँचच्या एसीपी निधी सक्सेना यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, पिडितेनं मुल होत नाही म्हणून मिर्ची बाबाची भेट घेतली होती, त्यानंतर पिडितेच्या तक्रारीवरून बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळं आता आम्ही मिर्ची बाबाला ग्वाल्हेरमधून अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

विभाग

पुढील बातम्या