मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  TMC, NCP आणि CPI कडून का हिरावून घेतला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? कोणत्या अटी कराव्या लागतात पूर्ण

TMC, NCP आणि CPI कडून का हिरावून घेतला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? कोणत्या अटी कराव्या लागतात पूर्ण

Apr 10, 2023, 10:36 PM IST

  • Tmc ncp cpi no longer national parties : भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा  देत  तृणमूल काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.  वाचा काय आहे नियम..

राष्ट्रवादी व तृणमूलचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावला

Tmcncpcpinolongernationalparties : भारतीयनिवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP)आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. वाचा काय आहे नियम..

  • Tmc ncp cpi no longer national parties : भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा  देत  तृणमूल काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे.  वाचा काय आहे नियम..

भारतीय निवडणूक आयोगाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा  देत  तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. आयोगाने सोमवारी जारी केलेल्या आपल्या आदेशात उत्तर प्रदेशातील आरएलडी, आंध्र प्रदेशातील बीआरएस, मणिपूरमधील पीडीए,  पुद्दुचेरीतील पीएमके, पश्चिम बंगालमधील आरएसपी आणि मिझोराममधील एमपीसी यांना दिलेला राज्य पक्षाचा दर्जाही रद्द केला आहे. दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

UP : उत्तर पत्रिकेत 'जय श्रीराम' आणि क्रिकेटपटूंची नावं लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पास केलं; प्राध्यापकांची हकालपट्टी

Viral News : मैत्रिणीसाठी ऑर्डर केलेला बर्गर मित्राने अर्धा खाल्ला; संतापलेल्या दोस्ताने केली हत्या

Patna Hotels Fire: पाटणा रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल्सना भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

निवडणूक आयोगान राष्ट्रवादी, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेत मोठा धक्का दिला आहे. भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय-एम), बहुजन समाज पार्टी (बीएसपी), नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि आप आता राष्ट्रीय पक्ष आहेत.  आयोगाने म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर NCP आणि TMC यांना अनुक्रमे नागालँड आणि मेघालयमध्ये राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखले जाईल. 

राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी खालील तीन अटी पूर्ण कराव्या लागतात -

1. पक्षाच्या उमेदवारांनी किमान ४ राज्यांमधील गेल्या राष्ट्रीय निवडणुकीत प्रत्येक राज्यात एकूण मतदानाच्या किमान ६ टक्के मते मिळवली. याशिवाय लोकसभेच्या किमान ४ जागा जिंकायच्या आहेत.

2.राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान २ टक्के जागा जिंकणे अनिवार्य आहे. पक्षाचे उमेदवार किमान तीन राज्यांमधून निवडून आले पाहिजेत.

3. किमान ४ राज्यांमध्ये पक्षाला 'राज्य पक्ष' म्हणून मान्यता मिळावी, अशीही अट आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी देशात ७ राष्ट्रीय पक्ष होते - तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष,  भाजपा,  सीपीआय, सीपीआय (मार्क्सवादी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता NCP, TMC  आणि  CPI चा राष्ट्रीय दर्जा काढून या यादीत AAP चा समावेश केल्याने आता एकून राष्ट्रीय पक्ष ५ झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, 'एवढ्या कमी वेळात राष्ट्रीय पक्ष? हा चमत्कारापेक्षा कमी नाही. सर्वांचे खूप खूप अभिनंदन. देशातील कोट्यवधी जनतेने आपल्याला येथे पोहोचवले आहे. जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज लोकांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे.