मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रियंका गांधी ‘भारत जोडो’तून परतल्या

Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, प्रियंका गांधी ‘भारत जोडो’तून परतल्या

Jan 04, 2023, 09:14 PM IST

  • Sonia Gandhi admitted to hospital : प्रकृति बिघडल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोनिया गांधी

Sonia Gandhi admitted to hospital : प्रकृति बिघडल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Sonia Gandhi admitted to hospital : प्रकृति बिघडल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल केले आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपासून सोनिया गांधींची प्रकृती खराब असल्याने त्यांना आज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की,यूपीए अध्यक्षा व काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनवर देखरेख आणि उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीभारत जोडो यात्रेतून दिल्लीत परतल्या आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता उत्तरप्रदेशात पोहोचली आहे.

मंगळवारपासून सोनिया गांधींची प्रकृती खराब होती, त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी 'भारत जोडो यात्रेतून दिल्लीत परतले होते. मात्र आज'भारत जोडो यात्रा' सकाळी ६ वाजता बागपतमधील मावी कलान येथून पुन्हा सुरू झाली. मात्र आजच्या यात्रेत प्रियांका गांधी पदयात्रेत सामील झाल्या नाहीत.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी दुपारी गाझियाबाद येथील लोनी बॉर्डरपासून उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाली. दोन दिवसानंतर ही यात्रा हरियाणासाठी रवाना होईल. त्यानंतर पंजाब व हिमाचलमार्गे ही यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचेल व यात्रेची सांगता होईल.