मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Samsung Galaxy:मिड रेंज फोन विकत घेण्याच्या तयारीत आहात? जरा थांबा, येतोय उत्तम वैशिष्ट्यांसह हा फोन

Samsung Galaxy:मिड रेंज फोन विकत घेण्याच्या तयारीत आहात? जरा थांबा, येतोय उत्तम वैशिष्ट्यांसह हा फोन

Aug 11, 2022, 10:03 AM IST

  • Samsung Galaxy A23e Smart Phone : सॅमसंग गॅलेक्सी A23e नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी A23 5G चा उत्तराधिकारी असल्याचे मानले जाते.

सॅमसंग फोन (हिंदुस्तान टाइम्स)

Samsung Galaxy A23e Smart Phone : सॅमसंग गॅलेक्सी A23e नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी A23 5G चा उत्तराधिकारी असल्याचे मानले जाते.

  • Samsung Galaxy A23e Smart Phone : सॅमसंग गॅलेक्सी A23e नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी A23 5G चा उत्तराधिकारी असल्याचे मानले जाते.

दक्षिण कोरियाचा स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग लवकरच आपला एक चांगला फोन सॅमसंग गॅलेक्सी A23e लॉन्च करणार आहे. मात्र, सॅमसंगकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण फोनची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच फोनचे रेंडर ऑनलाइन लीक झाले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी A23e च्या लीक झालेल्या रेंडर्सनुसार, हँडसेटमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले असू शकतो आणि ५.८ इंचाचा इन्फिनिटी V डिस्प्ले असू शकतो.त्याच्या मागे एकच कॅमेरा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी A23e नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी A23 5G चा उत्तराधिकारी असल्याचे मानले जाते.

ट्रेंडिंग न्यूज

Viral news : अन् जंगली हत्ती गावकऱ्यांसोबत चक्क क्रिकेट खेळू लागला…

एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, थोडा ब्रेक घ्या अन् जाऊन पाहा, VIDEO व्हायरल

UP Mobile Blast News: ईअरफोन लावून बाईक चालवत होती महिला, तितक्यात मोबाईलचा स्फोट झाला अन्...

एक लोकप्रिय टिपस्टर स्टीव्ह एच. मॅकफ्लाय (@OnLeaks) ने सॅमसंग स्मार्टफोनचे रेंडर आणि वैशिष्ट्ये लीक केली आहेत. हे लीक झालेले रेंडर हँडसेट काळ्या आणि पांढर्‍या रंगात दाखवतात आणि फोनच्या मागील बाजूस गॅलेक्सी ब्रँडिंग आहे. सॅमसंग फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह डिव्हाइसच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात एक सिंगल कॅमेरा सेंसर दिसत आहे. याशिवाय, पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर स्मार्टफोनच्या डाव्या बाजूला असल्याचे पाहायला मिळत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A23e One UI 5.1 वर आधारित Android 12 वर चालेल. समोर आलेल्या लीकनुसार, हँडसेटमध्ये ५.८ इंच-व्ही डिस्प्ले असू शकतो, त्यात सिंगल रियर कॅमेरा असू शकतो आणि साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह येऊ शकतो. सॅमसंग स्मार्टफोन ३.५ मिमी हेडफोन जॅक पॅक करू शकतो आणि २५ वॉट जलद वायर्ड चार्जिंगसह येण्याची अपेक्षा आहे.

फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट असण्याची अपेक्षा आहे. अफवांनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A23e या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या गॅलक्सी A23 5G मध्ये अपग्रेडसह येऊ शकतो.