मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ

Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ

Dec 05, 2022, 11:32 AM IST

    • Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aurangabad Crime News Marathi (HT_PRINT)

Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aurangabad Crime News Marathi : वाहनाला धक्का लागला म्हणून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गणपती मंदिरासमोर रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून रिक्षा ड्रायव्हरला मारहाण केल्याचा व्हिडिओही आरोपींनी व्हायरल केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील वरद गणपती मंदिरासमोर वाहतूक कोंडी झालेली असताना एका दुचाकीला रिक्षानं धक्का दिल्यानं दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकात वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर दुचाकीस्वारानं रिक्षाचालकाला मारहाण करायला सुरुवात केली. रिक्षाचालकाला रस्त्यावर लोळवून मारहाण होत असल्याचं पाहून उपस्थितांनी रिक्षाचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तरुण रिक्षाचालकाला मारहाण करतच होता. परंतु काही लोकांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद निवळला.

औरंगाबाद शहरातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात अजूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. परंतु रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहरात मारहाण आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील पडेगाव रोडवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळं आता शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा