मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Election : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी गुजरातमध्ये, आईबरोबर चहा घेत घेतले आशीर्वाद

Gujarat Election : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी PM मोदी गुजरातमध्ये, आईबरोबर चहा घेत घेतले आशीर्वाद

Dec 04, 2022, 11:24 PM IST

  • Gujarat election 2022 : गुजरात विधानसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये दाखल झाले असून आज त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर चहाही घेतला.

मोदींनी घेतले आईचे आर्शिवाद

Gujarat election 2022 : गुजरात विधानसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये दाखल झाले असून आज त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर चहाही घेतला.

  • Gujarat election 2022 : गुजरात विधानसभेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये दाखल झाले असून आज त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर चहाही घेतला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट संपला आहे. पंतप्रधान मोदी आज त्यांची आई हीराबेन मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. एएनआय वृत्तसंस्थेनेही पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदी आईसोबत बसून चहा पीत असल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. पीएम मोदींनी आईच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

DK Shivkumar Viral Video: खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले, सगळ्यांसमोर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली!

Farooq Abdullah : ''पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब''; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान

al jazeera ban in israel:इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी, हमास युद्धादरम्यान पंतप्रधान नेतन्याहूंची मोठी कारवाई

Viral Video: वडिलांच्या मृत्युनंतर १० वर्षांचा मुलगा घर चालवण्यासाठी विकतोय चिकन रोल, व्हिडिओ व्हायरल

उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान -
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १ डिसेंबर रोजी झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार कालच संपला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आपली पूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान मोदी उद्या मतदान करणार आहेत. मतदान करण्यापूर्वी पंतप्रधानांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या आईची भेट घेतली. पंतप्रधानांनी आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतले आणि एकत्र बसून चहाही घेतला. 

पंतप्रधानांनी ५० किलोमीटरचा रोड शो केला -
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर म्हणजेच १ डिसेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी ५० किमी लांबीचा रोड शो केला. पंतप्रधानांनी नरोदा ते अहमदाबाद असा रोड शो केला. रोड शोच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पीएम मोदी मोकळ्या छतावर असलेल्या कारमध्ये बसून रोड शो करत आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी एवढा मोठा रोड शो केला नव्हता. खुल्या कारवर स्वार होऊन पीएम मोदींनी विक्रम रोड शो केला.

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात गुरुवारी ८९ जागांसाठी मतदारांनी ७८८ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद केले. पहिल्या टप्प्यात एकूण ५९.२ टक्के मतदान झाले आहे. पुढील टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे.यावेळी राज्यातील लढत तिरंगी असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत असायची. या वेळी आम आदमी पक्षही पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.