मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  PFI ने पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट आखला होता; पाटण्यातील सभेत करणार होते लक्ष्य, ईडीचा खळबळजनक दावा

PFI ने पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट आखला होता; पाटण्यातील सभेत करणार होते लक्ष्य, ईडीचा खळबळजनक दावा

Sep 24, 2022, 09:42 AM IST

    • PFI Master plan to attack PM Narendra Modi : पीएफआयवरील छाप्यांनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI चे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणार होते, असा खळबळजनक दावा ईडीने केला आहे.
Prime Minister Narendra Modi (ANI Photo) (ANI)

PFI Master plan to attack PM Narendra Modi : पीएफआयवरील छाप्यांनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI चे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणार होते, असा खळबळजनक दावा ईडीने केला आहे.

    • PFI Master plan to attack PM Narendra Modi : पीएफआयवरील छाप्यांनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. PFI चे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणार होते, असा खळबळजनक दावा ईडीने केला आहे.

दिल्ली : देशविघातक कारवाया करण्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांनी मिळून काही राज्यात मोठ्या प्रमाणात PFI या संघटनेच्या कार्यालयांवर छापेमारी करून १०० हून आधीक संशयितांना ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असताना आता ईडीने एक खळबळजनक खुलासा केला आहे. पाटणा येथील रॅलीमध्ये पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा डाव PFI च्या कार्यकर्त्यांचा होता असा धक्कादायक खुलासा ईडीने केला आहे. या बाबतचे वृत टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या सोबतच ही संघटना उत्तर प्रदेशातील संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या तयारीत होती असा दावा देखील करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

Hyderabad Rain : तप्त उन्हाळ्यात अचानक बरसला मुसळधार पाऊस, भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Porn Star Stormy Daniels : पायजम्यावर होते ट्रम्प; कंडोमही नव्हते घातले; प्रसिद्ध पॉर्न स्टारने केले गंभीर खुलासे

Covishield च्या साइड इफेक्टमुळे AstraZeneca चा मोठा निर्णय! बाजारातून लस मागवली परत

दोन दिवसांपूर्वी ईडी, राष्ट्रीय तपास यंत्रणा आई एटीएसच्या पथकाने मोठ्या प्रमाणात देशातील तब्बल १२ राज्यात छापेमारी केली. या कारवाईत या संघटनेच्या अनेकांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी केली असता, त्यांनी दिलेल्या महितीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृतानुसार या संघटनेने हा हल्ला करण्यासाठी काही शिबिरांची स्थापना केली होती. १२ जुलै रोजी पीएम मोदी हे पाटणा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. हा हल्ला तडीस नेन्यासाठी काही प्रशिक्षण शिबिराची स्थापना देखील करण्यात अली होती. २०१३ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवाद्यांनी त्यांच्या रॅलीमध्ये स्फोटही घडवला होता. ईडीच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

पीएफआय संघटनेने परदेशातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी निधी गोळा करून तो परदेशात आणल्याचे देखील टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. संघटनेच्या काही नेत्यांनी हा निधी गोळा करून तो भारतात आणला. हा निधी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खत्यातून आणण्यात आला. या निधीची माहिती ही सरकारी संस्थांकडून लपवून ठेवण्यात आली होती. हा निधी गोळा करतांना निधीचे देखील पालन करण्यात आले नाही असा देखील आरोप करण्यात आला आहे. भारतातील एनआरआय खाते वापरून त्यांनी पीएफआयसाठी परदेशातून पैसे ट्रान्सफर केले आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशाबाहेरील काही सदस्यांनी भारतातील ओव्हरसीज इंडियन्स खात्यांमध्ये निधी जमा केला आहे. जो निधी नंतर कट्टर इस्लामिक संघटनेकडे हस्तांतरित करण्यात आला.

 

विभाग