मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NIA And ED Raid : ईडी आणि एनआयएचं देशभरात छापासत्र; PFI च्या १०० जणांना अटक

NIA And ED Raid : ईडी आणि एनआयएचं देशभरात छापासत्र; PFI च्या १०० जणांना अटक

Sep 22, 2022, 08:36 AM IST

    • NIA And ED Raid : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील प्रदेशाध्यक्षांवर आणि जिल्हाध्यक्षांवर ईडी आणि एनआयएनं छापेमारी केली आहे. ही संघटना आतंकवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
NIA And ED Raid In Kerala (HT)

NIA And ED Raid : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील प्रदेशाध्यक्षांवर आणि जिल्हाध्यक्षांवर ईडी आणि एनआयएनं छापेमारी केली आहे. ही संघटना आतंकवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

    • NIA And ED Raid : पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातील प्रदेशाध्यक्षांवर आणि जिल्हाध्यक्षांवर ईडी आणि एनआयएनं छापेमारी केली आहे. ही संघटना आतंकवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

NIA And ED Raid In Kerala : ईडी आणि एनआयएनं मध्यरात्री पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांवर देशभरात छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे. संघटनेचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या घरावरही छापा मारण्यात आला असून देशभरातील प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांवर ईडीनं कारवाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आईच्या मृतदेहाजवळ तीन दिवस न खाता-पिता बसून राहिली मुलगी; बेशुद्धावस्थेत नेले रुग्णालयात, घडलं अघडित

Lok Sabha Election : एका तरुणाने भाजपला केले ८ वेळा मतदान; व्हिडिओही केला VIRAL, अखिलेश आणि काँग्रेसने घेरले

Vande Bharat : मुंबई-अहमदाबाद मार्गावर लवकरच तिसरी वंदे भारत! ताशी १६० किमी वेगाने धावणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

१० राज्यांच्या पोलिसांची मदत घेऊन एनआयए आणि ईडीनं ही कारवाई केली आहे. आतंकवाद्यांना फंडिंग करणे आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीरं आयोजित करण्याचा आरोपी पीएफआयवर आहे. त्यामुळं मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत संघटनेच्या १०० लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. देशभरातील या छापासत्रानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केरळच्या मलप्पुरममध्ये जोरदार आंदोलन करत तपास यंत्रणांविरोधात घोषणाबाजी केली आहे.

चेन्नईतही छापेमारी...

एनआयएनं तामिळनाडूतील कोयंबटूर, कुड्डलोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकाशी या ठिकाणांवरही छापेमारी केली आहे. याशिवाय चेन्नईत राहणाऱ्या अनेक PFI च्या नेत्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. त्याचबरोबर संघटनेच्या चेन्नईतील मुख्यालयावरही रेड मारण्यात आली आहे.

दरम्यान एक आठवड्यापूर्वी एनआयएनं आंध्रप्रदेशात वेगवेगळ्या भागांत छापेमारी केली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएनं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात देशभरात छापेमारी केली आहे.

विभाग

पुढील बातम्या