मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran khan : इम्रान खान यांना दिलासा.. उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Imran khan : इम्रान खान यांना दिलासा.. उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

May 12, 2023, 07:58 PM IST

  • Imran khan : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे. इम्रान त्यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मिळाला आहे.

Imran khan

Imran khan : इस्लामाबाद उच्च न्यायालयानेइम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे.इम्रानत्यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मिळाला आहे.

  • Imran khan : इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे. इम्रान त्यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मिळाला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधानव पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना जामीन मंजूर केला आहे.  इम्रान त्यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मिळाला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत तसेच त्यांना तासाच्या आत न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ मे रोजी अयोध्या दौऱ्यावर; रामलल्ला दर्शन, शरयू पूजन, असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन महिलांसह १० नक्षलवाद्यांचा खात्मा

Monsoon Update : खुशखबर! यंदा मान्सूनसाठी अनुकूल स्थिती, बरसणारही जोरदार ; ‘या’ दिवशी केरळात धडकणार

विटांची भिंत तोडून भरधाव कार घुसली घरात; ३ जण जखमी, कारचा चक्काचूर, पाहा Viral VIDEO

इम्रान खान यांना दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सनी इस्लामाबाद उच्च न्यायालय परिसरातून अटक केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान यांनाअटक करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मिळाला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अल कादिर ट्रस्ट भ्रष्ट्राचार प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या आवारातून उचलण्यात आले होते. इम्रान खान यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) आणि पाक रेंजर्सनी ओढत नेऊन व्हॅनमध्ये बसवले होते.

 

त्यावेळी त्यांना टॉर्चर केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला होता. यावेळी इम्रान यांच्या वकिलालाही मारहाण झाली होती. यानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. पीटीआयचे समर्थक लष्कराच्या मुख्यालयात घुसले होते. सर्व शहरात आंदोलन करण्यात आले.

विभाग