मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नवरात्रीत मुस्लिमांच्या दुकानांतून वस्तू खरेदी करू नका; साध्वी प्रज्ञांचं वादग्रस्त वक्तव्य

नवरात्रीत मुस्लिमांच्या दुकानांतून वस्तू खरेदी करू नका; साध्वी प्रज्ञांचं वादग्रस्त वक्तव्य

Sep 29, 2022, 11:44 AM IST

    • Navratri 2022 : नवरात्रीच्या उत्सवात मुस्लिमांच्या कोणत्याही शॉपवरून सामान खरेदी करू नका, असं वक्तव्य केल्यानं भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा नव्या वादात सापडल्या आहेत.
Sadhvi Pragya Singh Thakur Controversial Statement (HT)

Navratri 2022 : नवरात्रीच्या उत्सवात मुस्लिमांच्या कोणत्याही शॉपवरून सामान खरेदी करू नका, असं वक्तव्य केल्यानं भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा नव्या वादात सापडल्या आहेत.

    • Navratri 2022 : नवरात्रीच्या उत्सवात मुस्लिमांच्या कोणत्याही शॉपवरून सामान खरेदी करू नका, असं वक्तव्य केल्यानं भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा नव्या वादात सापडल्या आहेत.

Sadhvi Pragya Singh Thakur Controversial Statement : संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात असताना आता यावरून भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशच्या सरकारनं नवरात्रीबाबत एक नियमावली जारी केली होती, त्यावरून बोलताना मुस्लिमांच्या दुकानावरून नवरात्रीसाठी लागणारं कोणतंही सामान खरेदी करू नका, असं आवाहन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केल्यानं आता त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उद्या NEET परीक्षा! शूजवर बंदी, काय आहे ड्रेस कोड, जाणून घ्या परीक्षा केंद्रावरील १० नियम

viral news : मुलासोबत शारीरिक संबंध ठेवणे महिला नेत्याला पडले महागात! पक्षातून हकालपट्टी

Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येतील तिघा संशयितांना अटक

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

याबाबत भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश त्याची आधार कार्ड चेक केल्याशिवाय प्रवेश दिला जाऊ नये, याशिवाय या उत्सवांमध्ये मुस्लिमांना प्रवेश देता कामा नये, कारण आपल्या पूजा-अर्चना शुद्ध पद्धतीनं व्हायला हव्यात, असं वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं.

याशिवाय मुस्लिम कारागिरांनी तयार केलेल्या कोणत्याही वस्तूंचा वापर नवरात्रोत्सवात केला जाऊ नये, याशिवाय नवरात्रीच्या कार्यक्रमस्थळांच्या आसपास मुस्लिमांची दुकानंही असू नयेत, हिंदुंनी या उत्सवाच्या काळात मुस्लिमांच्या दुकानातून कोणतीही खरेदी करू नये, असं आवाहन खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केल्यानं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

गृहमंत्र्यांनीही दिले आदेश...

नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याचं आधार कार्ड चेक केल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, असे आदेश गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलेले आहेत. त्यानंतर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.