मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule : भाजपच्या ‘मिशन बारामती’ला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Supriya Sule : भाजपच्या ‘मिशन बारामती’ला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 10:05 AM IST

Supriya Sule in Indapur Pune : सर्वांना माहिती आहे, शरद पवार विरोधात गेले की राज्याच्या दौऱ्यावर निघतात, असंही सुळे म्हणाल्या.

NCP MP Supriya Sule Speech in Indapur
NCP MP Supriya Sule Speech in Indapur (HT)

NCP MP Supriya Sule Speech in Indapur : काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीतील कार्यक्रमात राष्ट्रावादीच्या नेत्यांमध्ये धुसफूस झाल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राचा एक दौरा केला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

पुण्यातील इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार हे गेल्या ५५ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात काम करत आहेत. त्यांची २७ वर्ष ही सत्तेत आणि तितकीच वर्ष विरोधी पक्षात गेली. परंतु त्यांना विरोधी पक्षात असताना राज्याच्या जनतेनं जास्त प्रेम दिलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार विरोधात गेले की महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्या दौऱ्यात काय गंमत होते काय माहिती, पण त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला की ते राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळते, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी रणनिती आखली आहे. कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या दुसऱ्यांदा बारामतीच्या दौऱ्यावर येऊन गेल्या आहेत. याशिवाय भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील नेते बारामतीच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आता पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं भाजपच्या या प्रयत्नांचं स्वागत केलं आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी या वक्तव्यातून भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे.

IPL_Entry_Point