मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ahmedabad Gujarat : गरबा कार्यक्रमात आल्यानं मुस्लिम तरुणांवर हल्ला; हिंदू संघटनांवर मारहाणीचा आरोप

Ahmedabad Gujarat : गरबा कार्यक्रमात आल्यानं मुस्लिम तरुणांवर हल्ला; हिंदू संघटनांवर मारहाणीचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 29, 2022 09:33 AM IST

Muslim youth beaten video : या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात काही लोक दोन तरुणांना बेदम मारहाण करताना दिसत आहे.

Muslim youth beaten video In Ahmedabad
Muslim youth beaten video In Ahmedabad (HT)

Muslim youth beaten video In Ahmedabad : नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात आले म्हणून दोन मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ही घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडल्याचं सांगितलं जात आहे. हे दोन्ही मुलं गरबा पाहण्यासाठी आले होते, त्यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादेतील एसपी रिंग रोड परिसरात गरबा सुरू असताना तिथं दोन मुस्लिम तरुण आले. त्यावेळी काही लोकांना त्यांच्यावर संशय आल्यानं त्यांनी याबाबतची माहिती हिंदू संघटनांना दिली. त्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही तरुणांना तिथं का आले, याचा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्यानं हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणांचे कपडे फाडून बेदम मारहाण केली. हल्लेखोरांच्या तावडीतून तरुण पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अहमदाबादेतील गरबा कार्यक्रमात हे तरुण चोरी करण्याच्या आणि तरुणींची छेड काढल्याच्या उद्देशानं तिथं आले होते, असा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. या प्रकरणात अजून पोलिसांत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आता पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ज्या युवकांवर हल्ला झाला, त्यांना शोधून त्यांचा जबाब घेतल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point