मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  उपराष्ट्रपती निवडणुकीत NDA ची बाजी, जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती निवडणुकीत NDA ची बाजी, जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

Aug 06, 2022, 08:04 PM IST

    • उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा विजय झाला आहे.
जगदीप धनखड

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा विजय झाला आहे.

    • उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा विजय झाला आहे.

नवी दिल्ली–उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा विजय झाला आहे. तर यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा(Margaret Alva)यांना पराभव पत्करावा लागलाआहे. जगदीपधनखडयांना५२८मते मिळाली आहेत.देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडली. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आणि एनडीएचे जगदीप धनखड यांच्यात थेट लढतहोती. पण या लढतीत भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेत सर्वाधिक जागा असल्याने जगदीप धनखड यांचा विजय निश्चित मानला जात होता.

ट्रेंडिंग न्यूज

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

जगदीप धनकड यांना ५२८  मते तर मार्गारेट अल्वा  यांना  १८२  मते मिळाली. जगदीप धनखड ११ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे.

जगदीप धनखड हे ७१ वर्षांचे असून ते राजस्थानमधील प्रभावशाली जाट समाजातील आहेत जगदीप धनखड हे सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. त्यांचे राजस्थानशी घट्ट नाते आहे. त्यांचे जन्मस्थान झुंझुनू आणि कर्मस्थळ जयपूर उच्च न्यायालय होते. ते राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत. धनखड ११ वर्षे काँग्रेसमध्ये होते. 

राजस्थानमध्ये जाटांना आरक्षण मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धनखड हे केंद्रीय मंत्रीही होते. १९८९ ते १९९१ पर्यंत ते झुंझुनू येथून जनता दलाचे सदस्य होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी अजमेरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला. नंतर २००३ मध्ये धनखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि किशनगडमधून आमदार म्हणून निवडून आले होते. सध्या ते पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत.