मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Motorola : २०० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या मोबाईलचा सेल झाला सुरु,काय आहेत वैशिष्ट्य पाहा

Motorola : २०० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या मोबाईलचा सेल झाला सुरु,काय आहेत वैशिष्ट्य पाहा

Sep 22, 2022, 11:42 AM IST

  • Moto Edge 30 Fusion with 200MP कॅमेरा Moto Edge 30 Ultra विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य आता हा फोन खरेदी करू शकतील. हे २३ सप्टेंबरपासून हा फोन सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

मोटोरोला फोन (हिंदुस्तान टाइम्स)

Moto Edge 30 Fusion with 200MP कॅमेरा Moto Edge 30 Ultra विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य आता हा फोन खरेदी करू शकतील. हे २३ सप्टेंबरपासून हा फोन सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

  • Moto Edge 30 Fusion with 200MP कॅमेरा Moto Edge 30 Ultra विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य आता हा फोन खरेदी करू शकतील. हे २३ सप्टेंबरपासून हा फोन सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

२०० मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या जगातील पहिल्या स्मार्टफोनची विक्री - Moto Edge 30 Ultra आज सुरू झाली आहे. तसेच, काल रात्री म्हणजेच २१ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून Edge 30 Fusion देखील खरेदी करता येणार आहे. आजपासून बिग बिलियन डे सेलमध्ये दोन्ही फोन फ्लिपकार्ट प्लस सदस्य खरेदी करू शकतात. Moto Edge 30 Ultra ची किंमत ५९ हजार ९९९रुपये आहे, परंतु सेलमध्ये हीच सूट ३ हजार रुपयांचीही असू शकते. कंपनी Moto Edge 30 Fusion वर ३ हजार रुपयांची सूट देखील देत आहे.डिस्काउंटनंतर हा फोन ४२ हजार ९९९ रुपयांऐवजी ३९,९९९ रुपयांना मिळेल. ३ हजार रुपयांच्या सवलतीसाठी तुम्हाला आयसीआयसीआय किंवा अॅक्सिस बँक कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

Viral Video: पतीचे दोन्ही हात बांधून दिले सिगारेटचे चटके, नंतर चाकूनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न, पत्नीला अटक

Viral Video : ७५ लाख किंमतीच्या कारमध्ये फिरते वडापाव विकणारी तरुणी; हे कसं घडलं?

Air India Express Flight: एअर इंडिया एक्सप्रेसचे ७८ उड्डाणं अचानक रद्द ! आजारी असल्याचे कारण देत क्रू मेंबर्स गेले रजेवर

<p>मोटोरोला फोन</p>

काय आहेत Moto Edge 30 Ultra ची वैशिष्ट्ये आणि तपशील

फोनमध्ये, कंपनी १४४ हर्टझच्या रीफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा फुल HD + POLED डिस्प्ले देत आहे. HDR10+ ला सपोर्ट करणाऱ्या या फोनची पीक ब्राइटनेस लेव्हल १२५० नीटस आहे. डिस्प्ले संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देखील आहे. फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून, तुम्हाला त्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट मिळेल.

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये २०० मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला तब्बल ६० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी १२५ वॅटच्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. खास गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला ५० वॅट वायरलेस चार्जिंग देखील मिळेल. हा फोन, जो इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट रंग पर्यायांमध्ये येतो, Android 12 वर आधारित MyUX वर काम करतो.

काय आहेत Moto Edge 30 Fusion ची वैशिष्ट्ये

कंपनी या फोनमध्ये ६.५५ इंच डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १४४ हर्टझच्या रीफ्रेश दर आणि ३६० हर्टझच्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज असलेला हा फोन स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी तुम्हाला यात ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी ४ हजार ४०० एमएएच आहे, जी ६८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज हा फोन Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्सवर काम करतो.

 

विभाग